Salcete Villagers will agitate for west side road Dainik Gomantak
गोवा

पश्चिम बगल रस्त्याबाबत ग्रामस्थ करणार आंदोलन

पेडा, बाणावलीवासीयांचा पाईपलाईनला विरोध

दैनिक गोमन्तक

सासष्टी : पश्चिम बगल रस्ता व मलनिस्सारण पाइपलाइन संबंधी पेडा, बाणावलीचे नागरिक एकत्र आले. त्यांनी बैठक घेतली व यासंबंधी प्रखर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. स्टिल्टशिवाय पश्र्चिम बगल रस्त्याला आमचा विरोध आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोलवा (Colva) येथील सांडपाणी प्रक्रिया प्लॅंट ते साळ नदीपर्यंतच्या जमिनीखालील पाईपलाईनलाही आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी आम्ही दक्षिण गोवा (South Goa) खासदार फ्रांसिस सार्दिन यांची भेट घेणार असून हे प्रकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी आग्रह करण्यात येणार आहे, असे जिल्हा पंचायत सदस्य हांझेल फर्नांडिस, रॉयला फर्नांडिस व रॉक फर्नांडीस यांनी सांगितले.

खासदार सार्दिन यांनी भेट निश्र्चित केली आहे, असे रॉक फर्नांडिस याने सांगितले. तसेच आमदार वेन्झी व्हिएगश यांनी सुद्धा नागरिकांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला असल्याचे हेन्झल फर्नडिस म्हणाले.

पाणी घरांत येईल!

जर पश्चिम बगल रस्ता स्टिल्टवर उभारला नाही, तर पावसाळ्यात येथे पाणी साचेल. हे पाणी (water) जवळच्या घरांमध्ये शिरेल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. तसेच जर प्रक्रिया केलेले सांडपाणी साळ नदीत सोडले तर नदी अस्वच्छ होईल. शिवाय नदी परिसरातील शेत जमीन खराब होण्याची शक्यता आहे. जलप्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण होतील, त्यासाठी हा प्रश्‍न त्वरित सोडविणे आवश्‍यक आहे, असेही ग्रामस्थांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT