Goa Education Department  Dainik Gomantak
गोवा

Goa Education Department : ‘खासगी अनुदानित’ना ‘ॲक्सिस’ मधून पगार

गोमन्तक डिजिटल टीम

Margao : सरकारी नोकरांचे वेतन राष्‍ट्रीयकृत बँकेतून द्यावे, असा सर्वसाधारण संकेत असताना अनुदानित विद्यालयाच्‍या कर्मचाऱ्यांना ‘ॲक्सिस’ या खासगी बँकेतून ऑनलाईन वेतन देण्‍याचा निर्णय शिक्षण खात्‍याने घेतला असून ‘मुख्‍यमंत्री गुरुदक्षिणा योजना'' या सुबक नावाखाली ही योजना पुढे रेटली आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी गुरूवारी हे परिपत्रक जारी केले. मात्र या परिपत्रकामुळे शाळा कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे.

दरम्यान, राष्‍ट्रीयकृत बँका असताना खासगी बँकेतून पगार देण्‍याची सरकारला गरज काय, असा सवाल केला जात आहे.

‘मुख्‍यमंत्री गुरुदक्षिणा योजना’ या नावाखाली ही नवीन योजना जारी केली असून शिक्षण खात्‍याने काल सर्व अनुदानित शाळांना हे परिपत्रक पाठवले आहे. या परिपत्रकाबरोबर एक विहित नमुना पाठविला असून मुख्‍याध्‍यापकांनी या नमुन्‍यात आपल्‍या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करुन ती बँकेला सादर करावी, असेही त्‍यात म्‍हटले आहे. गोवा राज्‍यात अनुदानित शाळेत काम करणारे दहा हजारांपेक्षा अधिक कर्मचारी असून या सर्वांना ॲक्सिस बँकेमध्‍ये खाते उघडण्‍याची सक्‍ती करण्‍यात आली आहे.

पगार हक्काचा; दक्षिणा का घ्यावी ?

दरम्‍यान, काही शिक्षकांनी या योजनेच्‍या नावालाच आक्षेप घेताना, पगार हा आमचा अधिकार आहे तो दक्षिणा या नावाने आम्‍ही का घ्‍यावा, असा सवाल केला आहे. सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्‍यक्ष जॉन नाझारेथ यांनीही या नावाला हरकत घेऊन शिक्षण खात्‍याच्‍या कर्मचाऱ्यांच्या पगाराशी मुख्‍यमंत्र्यांचा काय संबंध, असा सवाल केला आहे.

नाझारेथ यांनी सरकारकडे शिक्षकांच्या वेतनासाठी कित्‍येकदा पुरेसा निधी नसतो. निधी नसला तरी बँक वेळेवर कर्मचाऱ्यांना पगार देईल, नंतर सरकार बँकेकडून घेतलेले हे कर्ज समजून व्‍याजासह तो निधी बँकेला परत करण्‍याची शक्‍यता त्‍यांनी व्‍यक्‍त केली. ही योजना नेमकी काय आहे, हे तपासून बघावे लागेल.

राष्‍ट्रीयकृत बँकांना सहाय्‍य करणे हे कुठल्‍याही सरकारचे कर्तव्‍य असते. ज्‍या सॉफ्‍टवेअरचे नाव घेऊन ही योजना पुढे ढकलली जात आहे, तशी सॉफ्‍टवेअर्स राष्‍ट्रीयकृत बँकांकडेही आहेत. खासगी बँकेकडून ‘दक्षिणा’ मिळाली असावी, यामुळेच खासगी बँकेला मोठ्या प्रमाणात खाती उघडून दिली जात आहेत.

- प्रसन्न उटगी, आयटक अध्यक्ष

अनुदानित विद्यालयातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात सुलभता यावी यासाठीच ‘ॲक्सिस’ शी खात्‍याने समन्‍वय साधला आहे. या बँकेचे सॉफ्‍टवेअर युजर फ्रेंडली आहे. त्‍यामुळे या बँकेशी खात्‍याने समन्‍वय साधला आहे. दोन खासगी बँकांनी प्रेंझेटेशन दिले होते. त्‍यातील ॲक्सिसचे प्रेंझेटेशन चांगले झाल्‍याने त्‍यांना हे काम दिले.

- शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

SCROLL FOR NEXT