Goa Sal Panchayat Meeting Dainik Gomantak
गोवा

Sal Panchayat: साळ पंचायतीची ग्रामसभा झाली खेळीमेळीच्या वातावरणात

Goa Sal News: ग्रामसभेत विविध सरकारी योजनांसाठी लाभार्थींकडून आलेल्या अर्जांवर चर्चा करून निर्णय घेतले

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली तालुक्यातील साळ ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. सरपंच सावित्री घाडी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या ग्रामसभेत सुरवातीला सरपंच घाडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तद्नंतर पंचायत सचिव मुकेश नाईक यांनी मागील सभेचा अहवाल वाचून दाखवला व तो संमत करण्यात आले.

या ग्रामसभेत विविध सरकारी योजनांसाठी लाभार्थींकडून आलेल्या अर्जांवर चर्चा करून निर्णय घेतले, २०२४ - २५ सालच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. २०२३ - २०२४ सालच्या जमाखर्चाचे वाचनही सचिवाने करून दाखवले व २०२३-२४ सालच्या प्रशासकीय अहवालास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांकडून आलेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या ग्रामसभेतील चर्चेत फटी राऊत, यशवंत राऊत, मुकुंद राऊत, प्रकाश परब, आनंद नाईक, सुरेश परब, महादेव राऊत, अमेय तारी, नामदेव राऊत, रोहन परब, श्रावणी राऊत, कीर्ती राऊत, प्रिया राऊत, अर्चना परब, प्रांजल नाईक तसेच विद्यार्थिनी नेहा राऊत यांनी भाग घेतला. सरपंच सावित्री घाडी, उपसरपंच देऊ राऊत, पंच नीता राऊत, विशाल परब व वैष्णवी परब यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांचे योग्य निरसन करून पुढील कारवाई करू असे सांगितले. पंच दिव्या नाईक व मनु शिंदे सदर या ग्रामसभेस उपस्थित नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT