Goa Crime Updates Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime: हणजूण घुसखोरी प्रकरण! साखळीतील जिम इन्स्ट्रक्टरला अटक; आणखी काहीजण लवकरच ताब्यात, पोलिसांची माहिती

Anjuna illegal house eviction case: हणजूण पोलिसांनी घुसखोरीसाठी वापरण्यात आलेले तीन बाऊन्सर्स संशयित राकेश शहा, परशुराम गावस, विकी नाईक यांना अटक केली होती.

Sameer Panditrao

पणजी: सेंट मायकल वाडा, हणजूण येथे बेकायदा घरात घुसून ब्रॉन्विन सिनारी कुटुंबीयांना घरातून हाकलून लावल्याप्रकरणी क्राईम ब्रँच पोलिसांनी गोकुळवाडी-साखळी येथील व्यायामशाळा प्रशिक्षक (जिम इन्स्ट्रक्टर) संशयित गौस खताल शेख याला अटक केली. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या संशयितांची संख्या सहा झाली आहे. आणखी काहीजणांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

या घटनेनंतर हणजूण पोलिसांनी घुसखोरीसाठी वापरण्यात आलेले तीन बाऊन्सर्स संशयित राकेश शहा, परशुराम गावस, विकी नाईक यांना अटक केली होती. हे प्रकरण गंभीर असल्याने ते क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर मुख्य सूत्रधार जनार्दन खोराते व निखिल शिरोडकर याला अटक झाली होती. सध्या हे सर्वजण सशर्त जामिनावर आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमी...

सिनारी कुटुंबियांना घरातून बाहेर काढण्याचा तसेच त्यांच्या मोलकरणीचे अपहरण करण्याचा गुन्हा ८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडला होता. विळा व कोयता घेऊन आलेल्या या बाऊन्सर्सनी घराचा मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कॅनडास्थित मायकल पीटर या विदेशीच्या मालकीच्या घरात तक्रारदार ब्रॉन्विन सिनारी, तिचे पती राजेंद्र सिनारी व कुटुंबीय वास्तव्यास होते. घटनेवेळी आपण मालमत्तेचा मुखत्यारपत्रधारक (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) असल्याचा दावा करीत संशयित जनार्दन खोराटे याने १५ ते २० लोकांच्या सहाय्याने घरात घुसखोरी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT