Bashudev Bhandari Canva
गोवा

Saint Estevam Accident: बाशुदेवप्रकरणी गुंता वाढला! कारमधील व्यक्तीला पाहिलेच नाही; पाठलाग करणाऱ्या तरुणांनी बदलली जबानी

गोमन्तक डिजिटल टीम

बाशुदेव भंडारी याच्या कारचा पाठलाग केलेल्या कारमधील दोन युवकांची गुरुवारी (3 ऑक्टोबर) दिवसभर पोलिस मुख्यालयात चौकशी करण्‍यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी उपस्‍थित होते. बाशुदेवचे वडील नारायण आणि भाऊ बलराम यांच्या समक्ष या दोघांना प्रश्‍‍न विचारण्यात आले. त्‍यांनी आपली कार हुबळी येथे सोडून दिली होती तर ते बेळगावला गेले होते. पोलिसांनी कार जप्त केल्यानंतर त्यांना पकडून गोव्यात आणले होते. कारमधील व्यक्तीला आम्ही पाहिलेच नाही, अशी भूमिका आता त्‍यांनी घेतली आहे.

या युवकांनी दिलेली माहिती आणि बाशुदेवच्या कारमधील युवतीने दिलेली माहिती जुळत नसल्याने त्या मुद्यांची दखल पोलिसांनी घेतली असल्याचे नारायण यांचे म्हणणे आहे. ३१ ऑगस्टच्या रात्री साखळी येथून पणजीच्या दिशेने येताना विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कारला बाशुदेवच्या कारची धडक बसली होती. यामुळे त्या कारमधील व्यक्तींनी आपली कार वळवून बाशुदेवच्या कारचा पाठलाग केला होता.

सांतइस्तेव येथे बाशुदेवची कार पोचली तेव्हा त्या कारमधील व्यक्तींनी बाशुदेवच्या कारच्या दरवाजांवर हात मारत बाहेर येण्यास सांगणे सुरू केले होते. तर, ‘किती नुकसान झाले ते सांगा, मी पैसे देतो’ असे बाशुदेव त्यांना सांगत होता, अशी माहिती युवतीने व तेथे असलेला अन्‍य एका कारचालकाने पोलिसांना दिली होती.

परंतु असे काही घडलेच नसल्याचे त्या युवकांचे म्हणणे आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, आम्ही कारचा पाठलाग केला हे खरे आहे. सांतइस्तेव येथे पुढे रस्ता न दिसल्याने आम्ही कार वळवून माघारी फिरलो. युवतीने पोलिसांना सांगितले होते की, कार बुडू लागल्यावर त्यांच्याकडे मदतीची याचना केली असतानाही ते कार वळवून परत गेले होते. कारमध्ये बाशुदेव होता असे त्या युवकांनी सुरवातीला सांगितले होते, मात्र आता कारमधील व्यक्तीला आम्ही पाहिलेच नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत, असे बाशुदेवच्या वडिलांना वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्नाटककडून पाणी वळविण्याचे काम पुन्हा सुरू, प्रमोद सावंतांना म्हादईपेक्षा खुर्चीची जास्त चिंता; युरी आलेमाव

Goa Today's News Live: वेलिंगकरांविरोधात मडगाव पोलिस स्थानकावर निर्देशने!

IFFI Delegate Registration: तुमची उपस्थिती अगत्याची! 'इफ्फी'च्या प्रतिनिधी नोंदणीस सुरुवात; जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया

Goa News: सुभाष वेलिंगकरांविरोधात ख्रिस्ती बांधव आक्रमक; मंत्री सिक्वेरा म्हणाले सरकारही दखल घेणार

Secunderabad Vasco-Da-Gama Express: तेलंगणातून गोव्यासाठी धावणार एक्सप्रेस; रविवारी शुभारंभ, जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT