Illegal Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Extraction: तानावडेंनीच बेकायदेशीर रेती व्यवसायावरील कारवाई रोखली

Illegal Sand Extraction: कवठणकर यांचा आरोप: पत्रकार परिषदेत हल्लाबोल

दैनिक गोमन्तक

Illegal Sand Extraction: उच्च न्यायालयाने बेकायदेशीर सुरू असलेल्या रेती व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्हयबाग पोरस्कडे येथे कारवाईसाठी गेलेल्या पथकाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी फोन करून कारवाई न करण्यास सांगितल्याने पथकाने काढता पाय घेतल्याचा आरोप कॉंग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केला.

ते कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ऑडियो क्लिपही ऐकविली. कवठणकर म्हणाले, तानावडे अधिकाऱ्यांना सांगतात की ‘लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असताना अशा कारवाया का करत आहात? तुम्हाला न्यायालय महत्त्वाचे की आम्ही?’

अशा प्रकारची उच्च न्यायालयावर एका खासदाराने टिप्पणी करणे आणि कारवाईपासून पथकाला अडविणे ही दुर्भाग्यपूर्ण बाब असून न्यायालयाने या प्रकाराची स्वेच्छा दखल घ्यावी. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर आपल्याला बोलायचे नाही, असे सांगितले.

अवैध व्यवसायामुळे दलाली वाढली

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रेती व्यवसाय कायदेशीर करणार असल्याचे सांगितले होते, परंतु राज्यात तसेच केंद्रात मागील 10 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे, तरी देखील त्यांना हा प्रश्‍न सोडवता आलेला नाही. जी रेती पाच सहा वर्षांपूर्वी 8 हजार रुपये ट्रक मिळायची ती आता 36 हजार रुपये झाली आहे.

या दरात सर्वसामान्य गोमंतकीयांनी घरे बांधावी तरी कशी? या दरातील वाळू केवळ दिल्लीवाल्यांना परवडते. जे पारंपरिक रेती व्यवसाय करत होते त्यांचाही व्यवसाय बंद झाला आहे. अवैध व्यवसायामुळे दलाली वाढली असून हप्ता कुणाला पोहोचत आहे हे देखील तपासणे गरजेचे असल्याचे कवठणकर यांनी सांगितले.

आम्ही न्यायालयात जाणार

बेकायदेशीर रेती व्यवसाय सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रेती (वाळू) काढण्यात येत आहे. त्यामुळे नद्या तसेच पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे. तानावडे यांनी न्यायालयाबाबत विधान करून अवमान केला आहे. याबाबत आम्ही न्यायालयात जाणार असून न्यायालयासमोर ही ऑडियो क्लिप तसेच इतर माहिती सादर करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची विनंती करणार असल्याचे कवठणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT