Goa Politics: नगरसेवक कामिल बार्रेटो यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आपल्याला नगराध्यक्ष करण्याचे आश्वासन दिले आहे असा दावा केल्यानंतर मडगावचे नगराध्यक्ष दामाेदर शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता, कामिल बार्रेटो यांचा व्हिडिओ मी पाहिल्यावर मी स्वत: सदानंद तानावडे यांना फोन केला.
यावेळी तानावडे यांनी आपण कुणालाही कसलेही आश्वासन दिलेले नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे कामिल बार्रेटो यांच्याकडे कोणते तानावडे बोलले याची मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिरोडकर हे आजच दिल्लीहून गोव्यात पोचले असून त्यांना बार्रेटाे यांच्या दाव्याबद्दल विचारले असता, बार्रेटो फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक यांचेही नाव घेतात. मात्र बार्रेटो यांचा हा व्हिडिओ मी स्वत: दामू नाईक यांना पाठवेपर्यंत त्यांना याबद्दल कुठलीही माहिती नव्हती.
दामू नाईक यांनीही आपल्याला आपण कुणालाही काही सांगितलेले नाही असे सांगितले आहे. बार्रेटो हे दामू नाईक यांना आपले नेते मानतात, तर त्यांनी हा विषय त्यांच्याकडे बोलायला नको हाेता का? बार्रेटो हे स्वत:ला भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते मानतात. मग त्यांना भाजप पक्षात कशी शिस्त आहे ते माहीत नाही का? असा सवाल शिरोडकर यांनी केला.
शिरोडकर म्हणाले, पंधरा महिने फाताेर्ड्याचा, तर पंधरा महिने मडगावचा नगराध्यक्ष असावा हा फॉर्मुला विजय सरदेसाई यांच्या गटाकडे युती होती त्यावेळी ठरला होती. ही युती कधीच निकाली निघाली आहे.
भाजपाने आपले स्वत:चे नगरमंडळ स्थापन केल्यानंतर असा कोणताही निर्णय झाला नव्हता. कामिल बार्रेटाे यांचे आजचे वक्तव्य पाहिल्यास दामू नाईक, दिगंबर कामत आणि सदानंद शेट तानावडे यांच्यापेक्षा भाजपात त्यांचेच स्थान मोठे आहे की काय असे वाटते.
भाजपचे नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात
नगरसेवक कामिल बार्रेटो यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी दावा केल्याने भाजपचे नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात असल्याचे सिद्ध झाले. आज बार्रेटो यांनी मडगावात पत्रकारांना सांगितले की, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद मडगावच्याच नगरसेवकांना मिळावे हा फातोर्ड्यातील नगरसेवकांवरील अन्याय आहे. माझे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी पक्षाचे राज्य सरचिटणीस दामू नाईक यांना पुढील नगराध्यक्ष कामिल यांना करावे असे सांगितल्याचे तानावडे यांनी आपल्याला सांगितले आहे, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.