Sadanand Tanavade on Amit Palekar:  Dainik Gomantak
गोवा

Sadanand Tanavade: अमित पालेकर एवढे मोठे नाहीत! भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण कुणी दिले त्याचे नाव जाहीर करा...

खासदार सदानंद शेट तानावडे यांचे अमित पालेकर यांना आव्हान

Akshay Nirmale

Sadanand Tanavade on Amit Palekar: बाणस्तारी येथे झालेल्या मर्सडीज कार अपघात प्रकरणात गुरूवारी आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांना क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्यावर पालेकर यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर नाकारल्याने अटकेची कारवाई झाल्याचा आरोप केला होता.

त्यावर आता गोव्याचे राज्यसभेवर निवडून गेलेले भाजप खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पालेकर यांना टोला लगावला आहे. पालेकर एवढे मोठे नाहीत आणि असे आमंत्रण त्यांना कुणी दिले असेल तर त्यांनी नाव जाहीर करावे, असे आव्हानच तानावडे यांनी दिले आहे.

खासदार तानावडे म्हणाले की, अमित पालेकर हे काही इतके मोठे नेते नाहीत की भाजपने त्यांना पक्षात येण्यासाठी आमंत्रण द्यावे. आणि भाजपकडून अशा पद्धतीचे कोणतेही आमंत्रण दिले गेले नसल्याचे मी शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो.

जर कुणाला भाजपमध्ये यायची गरज वाटत असेल तर त्यांनी पक्षाच्या अध्यक्षांशी याबाबत बोलले पाहिजे. याबाबतची चर्चा आमदारांशी होऊ शकत नाही. मला याबाबत कुणीही काहीही सांगितलेले नाही. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.

गुरूवारच्या त्यांच्या वक्तव्यातून त्यांचे वैफल्य दिसून येत आहे. जर कुणी त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली असेल तर त्यांनी संबंधितांचे नाव सांगावे.

दरम्यान, 18 ते 22 सप्टेंबर या काळात संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले असून त्यात विविध महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. आत्तापर्यंत एक देश एक निवडणूक याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

पण, माझा त्याला पाठिंबा आहे. त्यातून वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे, असेही खासदार तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावमधील महिला उतरल्या रस्त्यावर! सरकारसह लोकप्रतिनिधी लक्ष्य; खनिज वाहतूक बंदच

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Sattari: सत्तरी तालुका लवकरच टँकरमुक्त! आमदार राणे यांचा निर्धार; वेळुस येथे 1.5 कोटींच्या कामाची पायाभरणी

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

SCROLL FOR NEXT