Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Student: परिवर्तन घडविण्याची क्षमता तरुणाईत

दैनिक गोमन्तक

Goa Student:

भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. अनेकांना लोकशाही टिकणार नाही, असे वाटत होते. परंतु दिवसेंदिवस भारतीय लोकशाही सक्षम होत असून समाजात परिवर्तन घडविण्याची क्षमता तरुणाईत आहे,असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

विद्यार्थी संसद स्पर्धेत आसगावच्या ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाने पहिला क्रमांक पटकावला. विद्यार्थी संसद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात सभापती बोलत होते. यावेळी मंत्री आलेक्स सिक्वेरा, मोहन आमशेकर सचिव नम्रता उलमन,प्रा.रूपेश मर्चंट व इतर उपस्थित होते.

तवडकर पुढे म्हणाले, राजकीय, सामाजिक तसेच इतर क्षेत्रात सकारात्मक नेते निर्माण होणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असेल तर त्यांचे लोक ऐकतात. तळमळीने काम करणारी तरूणाई देशाला हवी आहे आणि त्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही तवडकर यांनी सांगितले.

तरुणाई हाच देशाचा आधार !

आजची तरूणाई ही उद्याचे भारताचे भवितव्य आहे. आपण उद्याचे भारताचे नेते आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरूणाईला देशाची ताकद म्हणतात. लोकशाहीचा बुलंद आवाज असून जे कराल ते उत्तम करा, असे आवाहन विधिमंडळ कामकाजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केले.

स्पर्धेचा निकाल

विद्यार्थी संसद स्पर्धेत अनुक्रमे पहिला ज्ञानप्रसारक मंडळ कॉलेज, आसगाव,विद्या विकास मंडळ, गोविंद कारे कॉलेज ऑफ लॉ,मडगावला दुसरा तर रवी एस. नाईक कला आणि विज्ञान महाविद्यालयाने पटकावला.स्पर्धेचे परीक्षण व्हिक्टर गोन्साल्विस, ॲड.सदानंद मलिक ,जॉन फर्नांडिस यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सक्तीच्या नसबंदीला बळी पडलेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारला आदेश

SCROLL FOR NEXT