Unemployment In Goa:  Dainik Gomantak
गोवा

Unemployment In Goa: राज्याचा तरूणांच्या बेरोजगारी दर 27.4 टक्के

केंद्राचा अहवाल : आम आदमीच्या युवा शाखेची भाजप सरकारवर टीका

दैनिक गोमन्तक

Unemployment In Goa: केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या बेरोजगारी अहवालावरून आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी शुक्रवारी भाजप सरकारवर जोरदार टीका करत सरकारने गेल्या वर्षी 2.6 कोटी रुपये खर्चून आयोजित केलेल्या, नोकर भरती मेळाव्याची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली आहे.

आप युवा शाखेचे अध्यक्ष रोहन नाईक म्हणाले, पीएलएफएस अहवालानुसार, गोव्याचा बेरोजगारी दर 9.7 टक्के आहे. देशात गोवा बेरोजगारी नोंदीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेहमी दावा करतात, की भाजप सरकारने राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.

सरकारने गेल्या वर्षी 2.6 कोटी रुपये खर्च करून, नोकर भरती मेळावा देखील आयोजित केला होता. त्याचा काय परिणाम झाला? भाजप सरकारने नोकर भरती मेळाव्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी जेणेकरून किती गोमंतकीयांना नोकरी मिळाली, हे समोर येईल, असे नाईक म्हणाले.

प्रत्येक निवडणुकीत भाजपचे सरकार जाहीरनामा घेऊन येते आणि तरुण युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी नोकऱ्यांचे गाजर दाखवते. मात्र, आजपर्यंत त्यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केलेली नाही, असे वक्तव्य आप युवा शाखेचे उपाध्यक्ष सलमान खान यांनी केले. खान यांनी मुद्रा योजना आणि इतर योजनांचा देखील पर्दाफाश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT