Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: एका क्लिकवर प्रत्येक पोलिस बीटवरील माहिती

Goa Police: ई-बीट बूक ॲप : गोवा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी; काम होणार सुटसुटीत

दैनिक गोमन्तक

गंगाराम आवणे

Goa Police: गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी शाखेच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ई-बीट बुक ॲपमुळे राज्यातील पोलिस यंत्रणा बळकट होणार असून सुरक्षेच्या अनुषंगाने अधिक सक्षमता येणार असल्याने हा ॲप राज्यासाठी सुरक्षा कवचाचे कार्य करणार आहे.

या ॲपमुळे पोलिस अधिकाऱ्यांना एका क्लिकवर प्रत्येक पोलिस बीटवरील सर्व आवश्यक माहिती मिळविण्यात मदत होणार आहे. हे ॲप अथर्व पारखे, ग्रीष्मा मदाम, आर्यन घोरपडे, अभिनव खुरुप, नॅथन हेन्रिक्स, रघुरन शेट्टी, रिधिकेश वेर्णेकर या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.

प्रत्येक पोलिस स्थानकांच्या अखत्यारीत अनेक विभाग (बीट्स) असतात. तेथील सर्व नोंदींसाठी एक बीट बुक असते. प्रत्येक पोलिस स्थानकातील मंदिरे, चर्च, बॅंक, पोस्ट ऑफीस, सार्वजनिक ठिकाणे तसेच महत्‍त्वाच्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेसाठी हाक हवाला घेऊन त्याचे नोंदणी बीट बुकमध्ये करतात.

या ॲपमध्ये माहिती नोंदवून प्रत्यक्षदर्शी पाहणी केल्याचे फोटो यात अपलोड केले जातील. त्यामुळे एकाअर्थी या ॲपमुळे बीट बुक डिजिटल होणार आहे.

गुन्हा घडल्यास पोलीस अधिकारी बीट बुक पाहत असतात जेणेकरून मागील इतिवृत्तात कळू शकेल. पोलीस अधिकाऱ्यांनी बीट बुक मागवून त्यावर अभ्यास करणे ही मोठी प्रक्रिया होते. ही माहिती पोलीस अधिकाऱ्यांना डॅशबोर्डद्वारे एका क्लिकवर मिळणार आहे. या ॲपसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एस.कृपाशंकर, पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, आयटी विभागाचे प्रमुख डॉ. नीलेश फळदेसाई यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT