Accident Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकार ‘ॲक्शन मोड’वर

जागृती : बारमध्ये ‘डोन्ट ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’; अटल सेतूवर ‘स्पीड गव्हर्नर’

दैनिक गोमन्तक

पणजी: झुआरी पुलावरील भीषण अपघातानंतरची अपघात मालिका संपायचे नावच घेत नाही. ठिकठिकाणी नागरिकांचे बळी जातच आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकार आणि प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आले असून अटल सेतूवर ‘स्पीड गव्हर्नर’ राबवण्यात येत असून त्याअंतर्गत स्पीड रडार आणि सूचना फलक लावण्याच्या कामाला सुरवात झाली आहे.

()

दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा समितीने राज्यातील बार आणि रेस्टॉरंटमध्ये ‘मद्यपान करून वाहन चालवू नका’ (डोन्ट ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह) असे फलक लावणे बंधनकारक करावे, अशी सूचना केली.

राज्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. राज्यातील महत्त्वाच्या पुलांबरोबरच रस्त्यांवर स्पीड गव्हर्नर ही संकल्पना राबवण्यात येत असून महत्त्वाच्या अटल सेतूवर वेग नियंत्रणाच्या संदर्भातील फलक लावण्याचे काम सुरू झाले आहे. याबरोबरच या पुलावर वाहनाच्या वेगाची माहिती देणारे ‘स्पीड रडार’ उभारण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना ऑनलाईन पद्धतीने थेट घरी दंडाची (चलन) पावती पाठवण्यात येणार आहे. याशिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस नियमित गस्त घालण्यात येणार आहे.

मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी प्रकरणे थेट न्यायालयात पाठवून त्यांचा वाहतूक परवाना (लायसन) रद्द करण्यासाठी पोलिस शिफारस करणार आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक खाते यांची मदत घेण्यात येत आहे.

पेडणेत युवक ठार; मालिका थांबेना!

चेतन हा युवक मोपा विमानतळावर हल्लीच कामाला लागला होता. आज रजा टाकून गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी तो निघाला होता. मात्र, धारगळ येथे त्याला ट्रकने उडवले. चेतनचे वडील वाहनचालक आहेत. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. चेतनला आई-वडील आणि लहान बहीण आहे. या घटनेची माहिती मिळताच वझरी गावावर शोककळा पसरली. मनमिळावू स्वभावाचा चेतन वाड्यावर सर्वांना परिचित होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT