Arjun Tendulkar Dainik Gomantak
गोवा

Arjun Tendulkar: अर्जुनचा रस आम्लेटवर ताव; कोकणी बोलत जिंकले अनेकांचे मन

अर्जुन सध्या गोव्यात रणजी सामने खेळत असून दोन महिन्यांपासून गोव्यात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Arjun Tendulkar : गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन सध्या गोव्यात रणजी सामने खेळत असून दोन महिन्यांपासून अर्जुन गोव्यात आहे. गोव्याच्या रणजी संघात पाहुणा क्रिकेटपटू म्हणून खेळत असलेल्या अर्जुन तेंडुलकरने शनिवारी वास्कोत येऊन रस आम्लेटचा आस्वाद घेतला.

अर्जुन तेंडुलकरला गोवा अधिक प्रिय झाल्याचे दिसत आहे. गोवा सध्या त्याच्यासाठी लकी ठरला आहे. सुरुवातीच्या काळात अर्जुन आणि सुयश प्रभूदेसाई यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळाली. दोघेही आयपीएलमुळे एकत्र आले होते. सध्या अर्जुन व सुयश सोबत दिसून येत आहेत. जीममध्ये दोघेही एकत्र दिसतात. आता हळूहळू अर्जुनने चांगले मित्रही तयार केले आहे.

सरावादरम्यान अर्जुनची स्थानिक खेळाडू व प्रशिक्षकांशी मैत्री झाली आहे. त्याने कोकणीही शिकण्यास सुरुवात केली आहे. आपल्या सहकारी खेळाडू मित्रांशी बोलताना तो कोकणीचा जास्तीत जास्त वापर करताना दिसतो. तसेच अर्जुन गोमंतकीय खाद्यपदार्थांच्या प्रेमातच पडला आहे. फिश थाली आणि रस ऑम्लेटचा आस्वाद अर्जुन बहुतांशवेळी घेताना दिसतो. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरही गोव्यात आला होता. मुलगा अर्जुन सोबत तो पारंपरिक गोवन जेवणाचा आस्वाद घेतना दिसला.

Arjun Tendulkar

दरम्यान, शनिवारी अर्जुन तेंडुलकरने वास्को शहरात भटकंतीची निवड केली व त्याने आपल्या मित्रांसमवेत वास्कोत फेरफटका मारला. नंतर संध्याकाळी वास्कोचा प्रसिद्ध रस आम्लेट खाण्याचा मोह त्याला आवरता आला नाही व त्याने मूरगाव पालिका उद्यानाजवळील रस आम्लेट गाड्यावर येऊन रस आम्लेटवर ताव मारला. यावेळी त्याने वास्कोतील प्रसिद्ध समाजसेवक शैलेश गोवेकर व एटीएस पोलिस निरीक्षक राया नाईक यांच्याशी गप्पागोष्टी मारल्या व रस आम्लेटचा मनमुराद आनंद लुटला. नंतर तो पर्वरीला रवाना झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

50 ओव्हरची मॅच, 35 धावा, 10 विकेट्स! वनडे क्रिकेटमधील सर्वात 'लाजिरवाणा' रेकॉर्ड; नेपाळ अन् श्रीलंकेच्या गोलंदाजांनी रचला इतिहास

"Hey, Stupid Trump" लिहून इराणनं डागली क्षेपणास्त्रे, ट्रम्प यांच्या 'अल्टिमेटम'ची उडवली खिल्ली; होर्मुजच्या वादावरुन डिवचलं VIDEO

IFL 2026: धेंपो क्लबसमोर आणखी एक कठीण आव्हान, शिलाँग लाजाँगविरुद्ध फातोर्डा येथे लढत

US Iran War: डेडलाईन संपण्यापूर्वीच अमेरिकेचा मोठा हल्ला! इराणी सैन्याचं अंडरग्राउंड हेडक्वार्टर उद्ध्वस्त; बंकर-बस्टर बॉम्बच्या वर्षावानं चुकला काळजाचा ठोका

SCROLL FOR NEXT