Ration Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Rationing Scam: एफआयआर रद्द करण्यासाठीची याचिका सचिन नाईककडून मागे

संशयिताने उच्च न्यायालयात दिले होते आव्हान

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rationing Scam: धान्यसाठा घोटाळा प्रकरणी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यासाठी या प्रकरणातील संशयित सचिन नाईक याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान आज संशयित सचिन नाईक याने ही याचिका मागे घेतली. संशयिताविरुद्ध क्राईम ब्रँचने तीन वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत.

गोव्यात नुकत्याच गाजलेल्या तूरडाळ आणि साखर घोटाळ्यानंतर गोव्यात तांदुळ आणि गव्हाचा घोटाळा समोर आला. गोवा अन्न पुरवठा खात्याच्या गोदामातून तांदूळ आणि गव्हाची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. राज्यात रेशनदुकानांवर वितरणासाठी आलेल्या धान्याची शेजारच्या कर्नाटक राज्यात नेऊन विक्री होत असल्याचं तपासातून स्पष्ट झालं होतं.

गुप्त माहितीच्या आधारे अन्नपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत पणजी, सांगे आणि कुंडईतील गोदाम सील केली. इतकंच नाही तर ट्रक आणि मालवाहू रिक्षाही पोलिसांनी जप्त केली. तसेच तब्बल 722 टन धान्य जप्त करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ध्वनिरोधक फोम, चुकीचे डिझाईन, नियम उल्लंघन ठरले घातक; प्रशासनाच्या उदासीनपणाचा मोठा फटका; आपत्कालीन यंत्रणा कुचकामी

Goa Live News: हडफडे दुर्घटनेतील 3 कर्मचाऱ्यांवर झारखंडमध्ये अंत्यसंस्कार; मृतदेह सुखरूप पोहोचले

Porvorim: पर्वरी मार्गावरील धूळ प्रदूषण संबंधित अहवाल एकत्र करा, शिफारशींची 'पॅरा-वाईज' यादी द्या; न्यायालयाचे निर्देश

Horoscope: 'या' राशींवर आज बजरंगबलीची कृपा! सर्व अडचणी होतील दूर; वाचा तुमचा दिवस कसा जाईल

IPL 2026 लिलाव! 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर; 'या' स्टार खेळाडूची अचानक एन्ट्री, मोठी बोली लागणार?

SCROLL FOR NEXT