Ghode Modani Festival   Gomantak Digital Team
गोवा

Saal Festival : नानोडा येथील पारंपरिक घोडेमोडणी उत्साहात

गुढी पाडव्याच्या पूर्व संध्येला हा कार्यक्रम असतो.

गोमन्तक डिजिटल टीम

Saal Festival : कित्येक वर्षापासून घोडेमोडणीची परंपरा नानोडा या गावात सुरू असून हे दृश्य पाहण्यासाठी विविध भागातून लोक येत असतात. गुढी पाडव्याच्या पूर्व संध्येला हा कार्यक्रम असतो. यंदाही मोठ्या उत्साहात घोडेमोडणीचा कार्यक्रम पार पडला.

वाटेतील देवतांचा आशीर्वाद घेऊन हे घोडे पारंपरिक वाटेने मार्गक्रमण करीत असतात. नानोड्याची ग्राम देवी श्री सातेरी पूरमार या ठिकाणी पुरोहितांकडून गाऱ्हाणे घातल्यानंतर घोडेमोडणीला सुरुवात होते. अवसरासह हे घोडे चव्हाटेश्‍वर या ठिकाणी जातात.

तिथे घोड्यांना अवसर येतो. तिकडून ते घोडे पिंपलेश्वर हे पारंपरिक स्थळ, शांतादुर्गा कलंगुटकरीन मंदिरात पोहचल्यावर मंदिराचे पुरोहित भुस्कुटे गावचे मानकरी, ग्रामस्थ यांच्याकडून घोड्यांची पूजा केली जाते त्यावेळी हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते.

आबोली फुलांची माळ घातली जाते. तिकडून ते घोडे रवळनाथ - भूतनाथ या मंदिराकडे जातात. तिथे मान दिल्यानंतर तेथील मानकऱ्यांकडून पूजा-अर्चा केली जाते. सातेरी देवी चरणी कौलप्रसाद दिल्यानंतर घोडे विसावतात. हळूहळू त्यांचा अवसर कमी होतो. घोडेमोडणीची समाप्ती होते. त्यानंतर कळंगुट ग्रामस्थांतर्फे पौराणिक नाटक सादर करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT