cannabis, weed  Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: तरुणाने घरातच लावली गांजाची झाडे; क्रिप्टो करन्सीत करायचा व्यवहार

Anti Narcotics Squad of Goa Police: संशयित हा डार्क वेब व टेलिग्राम या सोशल मीडिया चॅनेलवरून विदेशी ग्राहकांना आकर्षित करायचा

गोमन्तक डिजिटल टीम

रशियन तरुणाने पालये-पेडणे येथे भाड्याने घेतलेल्या जागेत गांजाची लागवड करून तो विदेशी ग्राहकांना डार्क वेब तसेच टेलिग्रॅम या सोशल साईट्सवरून विकत असल्याचे उघडकीस आले आहे. संशयित पेडणे तालुक्यातील काही नामांकित क्लबमध्ये तो डीजे म्हणून कार्यरत होता.

संशयित हा डार्क वेब व टेलिग्राम या सोशल मीडिया चॅनेलवरून विदेशी ग्राहकांना आकर्षित करायचा. तसेच पैशांचा व्यवहार हा क्रिप्टो चलनात व्हायचा. संशयित गांजाचे बियाणे हे कुरियरने आणायचा.

या बियाणाची आयातीसाठी आंतरराष्ट्रीय साइट्स तो वापरायचा. त्याने पालये-पेडणे येथे एक जागा घेतलेली. तिथे त्याने आपली लॅब (नर्सरी) उघडली होती. तेथूनच तो गांजाची लागवड करून हा नशेचा बाजार चालवायचा.

संशयित पत्नी व सहा वर्षांच्या मुलासोबत शिवोलीत वास्तव्यास होता. संशयित चोपडे येथे ग्राहकाला ड्रग्स पुरवठा करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली असता, छापा टाकून संशयितास एएनसीने त्यास अटक केली.

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) चोपडे बस थांब्याजवळ अटक केलेल्या संशयिताचे नाव ईउर्ली कोरोतीन (४१) आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १.०३ कोटी रुपयांचा २ किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त केला. संशयिताजवळ १.७ किलो वजनाचे हायड्रोपोनिक वीड व ३०० ग्रॅम वजनाचे पोलेन्स जातीचे हायड्रोपोनिक वीड सापडले. या २ किलो मुद्देमालाचा बाजारभाव १.०३कोटी रुपये इतका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT