गोवा

Russian Women Molested In Goa: दिल्लीच्या बिझनेस पार्टनरने केला घात, गोव्यात रशियन महिलेचा विनयभंग

महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना तिने पळ काढला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला.

Pramod Yadav

Russian Women Molested In Goa: दिल्लीतील बिझनेस पार्टनरने गोव्यात रशियन महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यात उत्तर गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, महिला आणि संशयित आरोपी एका व्यावसायिक बैठकीसाठी गोव्यात आले होते. रशियन महिला मुंबईहून आली होती, तर संशयित दिल्लीतून गोव्यात आला होता. रिसॉर्टमध्ये त्याने दोन खोल्या बुक केल्या होत्या.

याप्रकरणी 44 वर्षीय रशियन महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. संशयिताने महिलेला बेडवर ढकलून तिचे चुंबन घेतले. तसेच, महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना तिने पळ काढला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. 12 ऑक्टोबर रोजी उत्तर गोव्यातील एका रिसॉर्टच्या खोलीत ही घटना घडली.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधिन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (महिलेवर हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'महिलेची जबानी अद्याप दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवायची असून, संशयित आरोपीला CrPC च्या कलम 41A अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे,' असे वाल्सन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT