पणजी: दक्षिण गोव्यात भटक्या कुत्र्यांपासून पर्यटकांना होणारा त्रास सुरुच आहे. बाणावली समुद्रकिनाऱ्यावर जवळपास सहा भटक्या कुत्र्यांनी रशियन महिला पर्यटकांचा पाठलाग करुन त्यातील एकाने महिलेला चावा घेतल्याची घटना घडली. महिला पर्यटकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दृष्टी मरिन लाईफसेव्हर्सच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, बाणावली समुद्रकिनाऱ्यावर रशियन पर्यटक महिला फिरत असताना. सहा भटक्या कुत्र्यांनी महिलेचा पाठलाग केला. यातील एका कुत्र्याने महिलेचा चावा घेतला. दृष्टीच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला प्राथमिक उपाचार देऊन पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
होळीचा सण आणि सलग सुट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात दाखल झाले होते. याकाळात ही घटना घडल्याची माहिती दृष्टीने दिली आहे. याच काळात ४१ वर्षीय आर्यलँडच्या महिला पर्यटकाला स्टींगरे माशाने चावा घेतल्याची घटना वार्का समुद्रकिनाऱ्यावर घडली. दृष्टीने या महिलेला प्रथमोपचार देऊन सुरक्षितपणे हॉटेलवर सोडले.
पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर खडकावर चढण्याचा प्रयत्न करणे पंजाबच्या २४ वर्षीय पर्यटकाला अंगलट आले. पर्यटक खाली कोसळून जखमी झाला. दृष्टीच्या वतीने या पर्यटकाला आवश्यक उपचार देण्यात आले. याच परिसरात मुंबईचा आणखी एक पर्यटक खडकारुन घसरुन कोसळल्याची घटना घडली. यात पर्यटकाच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे.
आणखी एका घटनेत हैद्राबाद समुद्रकिनाऱ्यावर २४ वर्षीय महिला पर्यटक खोल पाण्यात जाताच बुडू लागली. दृष्टीच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यटक महिलेला सुरक्षितपणे समुद्रातून बाहेर काढले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.