Bullet Accident Dainik Gomantak
गोवा

Royal Enfield Accident : आधी बुलेट घसरली, मग भरधाव ट्रकने ठोकरलं! रशियन पर्यटक जागीच ठार

गोमन्तक डिजिटल टीम

Russian Tourist Killed in Bullet Accident : डिचोली-साखळी रस्त्यावरील सर्वण येथे झालेल्या भीषण अपघातात बुलेटस्वार रशियन पर्यटक ठार झाला, तर त्याच्या मागे बसलेली रशियन मैत्रीण ॲना मितीना (31, सध्या रा. हरमल) ही सुदैवाने बचावली. मात्र, ती किरकोळ जखमी झाली. आधी त्यांची बुलेट रस्त्यावरून घसरली, नंतर एका ट्रकने त्यांना ठोकरले. अपघातात ठार झालेल्या रशियन पर्यटकाचे नाव इलिया रोजोव (35) असे असून, तो सध्या मोरजी-पेडणे येथे एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता.

हा अपघात मंगळवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास झांट्ये कॉलेजजवळील क्रीडा संकुलासमोर घडला. यासंबंधी उपलब्ध झालेली माहिती अशी की, पर्यटनासाठी गोव्यात आलेला रशियन पर्यटक इलिया रोजोव हा हरवळे येथील धबधब्याला भेट देऊन बुलेटवरून (GA-11-F-3454) ॲना मितीना या मैत्रिणीसोबत डिचोलीच्या दिशेने जात होता. झांट्ये महाविद्यालयाजवळ पोचताच हा जीवघेणा अपघात घडला.

पर्यटकाचा तोल गेल्याने बुलेट घसरून तो आणि त्याची मैत्रीण रस्त्यावर पडली. त्याचवेळी एका ट्रकने इलिया याला जोरदार धडक दिली. त्यात तो जबर जखमी झाला. यावेळी संबंधित वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर इतर प्रवाशांनी 108 रुग्णवाहिकेला बोलावून जखमी इलिया याला डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी अपघातग्रस्तांसमवेत आणखी दोघे मित्र-मैत्रीण दुसऱ्या बुलेटवरून प्रवास करत होते.

ट्रकचालक ताब्यात

या अपघातातील ट्रक पोलिसांनी जप्त केला असून चालकाची चौकशी सुरू आहे. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पर्यटकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला आहे. डिचोलीचे पोलिस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT