Russian Tourist Murder Dainik Gomantak
गोवा

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Russian Tourist Murder Case: मोरजी व हरमल या दोन ठिकाणी झालेल्या दोन रशियन महिलांचा खून हा केवळ पैशांच्या आशेपोटी आणि प्रेम संबंधामुळेच केल्याचे उघड झाले आहे.

Sameer Amunekar

मोरजी: मोरजी व हरमल या दोन ठिकाणी झालेल्या दोन रशियन महिलांचा खून हा केवळ पैशांच्या आशेपोटी आणि प्रेम संबंधामुळेच केल्याचे उघड झाले आहे. हरमल बामन भाटी या एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या रशियन आलेक्सेई लिनोवा या पर्यटकाने एलिना नामक दोन रशियन महिलांचा गळा चिरून खून केला होता.

त्यानंतर त्याने तिसन्याही खुनाची कबुली दिली. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. संशयित आलेक्सेई लिओनोव याने मांद्रे पोलिसांना आज जबानी दिली.

यासंदर्भात, पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्याकडे संपर्क साधला असता, ते म्हणाले संशयिताने रशियन महिलांचा खून केल्याचे कबुली दिली आहे. पोलिस यासंदर्भात अधिक पुरावे गोळा करीत आहेत. त्याने केलेले हे खून हा पैशासाठी आणि प्रेम संबंधातून केलेले असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

दरम्यान, संशयित हा रशियन महिलांसोबत संबंध जुळवत होता. त्यांना आपल्या प्रेमात पाडून विश्वास संपादन करीत होता. या महिलेने इतर दुसऱ्यासोबत संबंध ठेवल्याचे त्याला कळले की, तो प्रचंड तणावाखाली यायचा. या रागातून तो महिलांना टार्गेट करीत होता.

त्यापूर्वी तो महिलांकडून मोठ्या प्रमाणात पैसही उकळत होता. जर पैसे देत नसेल तर महिलांचा मानसिक छळ देखील करायचा, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षकांना वेगवेगळ्या सूचना करून संशयिताने आणखी खून केलेत का तसेच तो जबान्या बदलून पोलिसांची दिशाभूल करीत आहे का, याचा तपास घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT