Rohan khaunte Dainik Gomantak
गोवा

रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल- हमास संघर्षाचा गोव्यात येणाऱ्या पर्यटक संख्येवर परिणाम - खंवटे

नवनिर्मित पर्यटनाचे लोकार्पण गोवा पर्यटन खात्यातर्फे करण्यात आले

Pramod Yadav

Russia-Ukraine, Israel-Hamas conflict: रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या इस्रायल हमासच्या संघर्षामुळे या देशांतून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे, असे राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे.

गोव्यातीलच नव्हे तर देशातील पर्यटनाची दिशा बदलणाऱ्या नवनिर्मित पर्यटनाचे लोकार्पण गोवा पर्यटन खात्यातर्फे करण्यात आले, यावेळी खंवटे बोलत होते.

रशिया, युक्रेन आणि इस्रायल हे तीन देशातून गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, असे खंवटे म्हणाले.

सध्या या देशांत सुरु असलेल्या युद्ध आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात नियमित येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

यामुळे निर्माण झालेल्या पर्यटक संख्येची पोकळी भरुन काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, हे विशद करताना खंवटे म्हणाले, "गेल्या वर्षभरात गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या बघितली तर ती मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. यावरून देशांतर्गत पर्यटकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

पण, आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यात सरासरी आठ दिवस मुक्काम करतात, तर देशी पर्यटकांचा मुक्काम चार दिवस असतो, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे खंवटे म्हणाले.

गोवा सरकारने अलिकडे आनोख्या पर्यटन स्थळांना प्रोत्साहन दिल्याने, राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे,

सध्या राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा 16 टक्के आहे. येत्या तीन वर्षांत तो 20 ते 24 टक्क्यांपर्यंत वाढावा, अशी आमचा प्रयत्न असेल, असे खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT