Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: ग्रामीण जनतेने आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे ः पिसुर्लेत ‘मेगा मेडिकल कॅम्प’चा 592 जणांना लाभ

गोमन्तक डिजिटल टीम

ग्रामीण भागात आयोजित ‘मेगा मेडिकल कॅम्प’ द्वारे तेथील लोकांना आपल्या आरोग्य तपासणीची संधी उपलब्ध करून त्यांना योग्य दर्जेदार सेवा देण्याची प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आरोग्य शिबिरातून मिळणाऱ्या आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा , असे आवाहन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी केले आहे. पिसुर्ले पंचायत क्षेत्रासाठी आयोजित मेगा मेडिकल कॅम्पच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

व्यासपीठावर पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, सरपंच देवानंद परब, जीएमसीचे डीन डॉ.शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालिका डॉ. गीता काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, वाळपई सामाजिक रुग्णालयाचे डॉ.श्याम काणकोणकर, पंचायत सदस्यांची उपस्थिती होती. 

आमदार डॉ.दिव्या राणे यांनी सांगितले, की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सत्तरी तालुक्यातील प्रत्येक पंचायतक्षेत्रात अशा स्वतंत्र आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. आतापर्यंत शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली आहे. सरपंच देवानंद परब यांनी सांगितले,की अशाप्रकारच्या शिबिराच्या आयोजनग्रामीण भागात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये चांगल्या प्रकारचे जनजागृती होत आहे.त्यामुळे येणाऱ्याकाळातही अशा शिबिरामध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकांनी भाग घ्यावा. 

सूत्रसंचालन वैभव गाडगीळ यांनी केले. डॉ. श्याम काणकोणकर यांनी आभार मानले. या शिबिरातील तपासण्यांचा 592 नागरिकांनी लाभ घेतला.

‘जीएमसी’वरचा विश्‍वास वाढतोय !

गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत.यामुळे आज गोवा मेडिकल कॉलेजच्या एकूण कारभारावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. दररोज ‘जीएमसी’ मध्येउपचारासाठी रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यापूर्वी सर्वसामान्यांव्यतिरिक्त कोणीही ‘जीएमसी’चे उपचार घेत नव्हते.

आज स्थिती पूर्णपणे बदललेली आहे. गोव्यातील नागरिक खासगी रुग्णालयाऐवजी व जीएमसीत उपचारासाठी जातात.यामुळे या यंत्रणेवरचा विश्वास वाढल्याचे सिद्ध होते,असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, सुपर-4 मधील 'हाय होल्टेज' सामना 'या' दिवशी रंगणार; जाणून घ्या वेळापत्रक

Rohan Desai: रोहन देसाई यांचे भवितव्य शुक्रवारी ठरणार, बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांच्या छाननी प्रक्रियेकडे लक्ष

Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

"दक्षिण गोव्‍यात येण्‍याची चूक करू नका..." टॅक्‍सीवाल्‍यांनी केली दमदाटी, अहमदाबाद येथील महिलेनं व्‍हिडिओद्वारे व्‍हायरल केली व्यथा Watch Video

Mhaje Ghar Yojana: अमित शहा उघडणार 'माझे घर'चे द्वार, 50 टक्‍के गोमंतकीयांना मिळणार लाभ - मुख्‍यमंत्री

SCROLL FOR NEXT