The runway of Dabolim International Airport in Goa will close night till September 
गोवा

दाभोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी सप्टेंबरपर्यंत रात्रीची बंद

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: गोव्यातील(Goa) दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाची(Dabolim International Airport) धावपट्टी काही दिवस विशेष वेळेत बंद राहणार आहे. नौदलाच्या मुंबई येथील(Naval Mumbai) प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत धावपट्टी बंद राहणार आहे. देखभाल दुरूस्ती, अद्ययावतीकरण यासाठी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी(Runway)  बंद ठेवण्यात येणार आहे.(The runway of Dabolim International Airport in Goa will close night till September) 

8 सप्टेंबरपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. नागरी विमान वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी हे काम रात्री करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा विमानतळ नौदलाच्या हंस तळाचा भाग असून लढाऊ व नागरी विमाने एकाच धावपट्टीचा वापर करतात.

या बहुकोटीच्या प्रकल्पात कॅट-2  इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) आणि कॅट-2 एअर फील्ड लाइटनिंग सिस्टम (SFLS) यासारखी आधुनिक एअरफील्ड उपकरण चालू करण्याच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत  धावपट्टीच्या आसपासची आधुनिक उपकरणे थेट एअर ट्रॅफिक कंट्रोल ( ATC) शी जोडली जाणार आहे, ज्यामुळे हवाई वाहतूक नियंत्रकांना एअरफील्ड सिस्टमचे उत्कृष्ट नियंत्रण राखता येइल.

एमएएफआय फेज-1 मध्ये आयएएफच्या 30 एअरफील्ड्सच्या श्रेणीसुधारणाचा समावेश होता आणि सैन्य आणि नागरी वापरकर्त्यांसाठी याचा मोठा फायदा झाला आहे. मंत्रालयाने टाटा पॉवर एसईडी बरोबर 1200 कोटी रुपयांचा करार केला ज्या अंतर्गत देशभरातील 37 विमानतळ आधुनिक केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोकण रेल्वेची मोठी कारवाई! 2025 मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 20.27 कोटींचा दंड वसूल

Plane Crash: ओडिशात विमान अपघात! राउरकेला-भुवनेश्वर चार्टर्ड विमान कोसळलं; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, 6 जखमी

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT