Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'नियमांचे पालन न केल्यास पोलीस कारवाई करणारच', सरदेसाईंच्या सभेवरील कारवाईवर रमेश तवडकरांचा सणसणीत टोला

Ramesh Tawadkar Statement: मंत्री तवडकर यांनी गोवा फॉरवर्डच्या आरोपांना उत्तर देताना सर्व राजकीय पक्षांना लागू असलेले नियम स्पष्ट केले.

Manish Jadhav

काणकोण: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांची काणकोण येथील सभा रोखल्याबद्दल भाजप सरकारवर 'लोकशाहीविरोधी' कृत्यांचे आणि राजकीय हस्तक्षेपाचे आरोप करण्यात आले. या आरोपांवर आता काणकोणचे आमदार आणि मंत्री रमेश तवडकर यांनी स्पष्टीकरण दिले. तवडकर यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप करण्यात आलेला नाही आणि भविष्यातही होणार नाही. पोलिसांनी केवळ नियमांचे पालन केले.

नियमांचे पालन करणे बंधनकारक

मंत्री तवडकर यांनी गोवा फॉरवर्डच्या आरोपांना उत्तर देताना सर्व राजकीय पक्षांना लागू असलेले नियम स्पष्ट केले. "प्रत्येकाने नियमांचे पालन केलेच पाहिजे. जर नियमांचे पालन केले नाहीतर पोलीस निश्चितच कारवाई करतील," असे तवडकर म्हणाले. सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. "आचारसंहिता लागू असताना कोणत्याही प्रकारची सभा आयोजित करण्यासाठी सर्व परवानग्या घेणे बंधनकारक असते," असे त्यांनी नमूद केले. तवडकर यांनी पुढे स्पष्ट केले की, हे नियम एका विशिष्ट पक्षासाठी नसून सर्वांसाठी समान आहेत.

राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावा

विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी थेट भाजप सरकारवर कारवाईचा आरोप केला असताना मंत्री तवडकर यांनी यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, "मी कोणत्याही प्रकारचे राजकारण केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कारवाई होते." मंत्री तवडकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, गोवा फॉरवर्डच्या सभेला आवश्यक परवानग्या नव्हत्या, त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT