मडगाव: मालभाट मडगाव येथील मशिदीच्या मागे तयार झालेला कचऱ्याचा ढिगारा आज स्थानिक नगरसेविका (Corporator) रोनिता आजगावकर यांनी पुढाकार घेऊन हटविला.
मडगाव बाहेरचे लोक आणि हॉटेलवाले आपला कचरा येथील मोकळ्या जागेत आणून फेकत असल्याने या भागात मिनी सोनसोडा तयार झाला होता. मडगाव नगरपालिकेच्या मदतीने पोकलीन लावून या कचऱ्याच्या राशी हटविल्या.
या संदर्भात बोलताना या प्रभागाचे माजी नगरसेवक राजेंद्र आजगावकर यांनी यापूर्वीच्या नगरसेवक तसेच स्थानिक आमदारांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानेच या कचऱ्याच्या राशी वाढल्या असा आरोप करत आता ही जागा साफ झाल्यानंतर तरी पुन्हा असा उकिरडा तयार होऊ नये यासाठी पालिका आणि मडगाव पोलिसांनी दक्ष राहावे अशी मागणी केली.
हा कचरा रात्रीच्या वेळी आणून टाकला जातो त्यामुळे पोलिसांनी रात्री या भागात गस्त ठेवावी आणि कुणी जर कचरा आणून टाकत असल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.