RTPCR Test Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांनो रेल्वेने प्रवास करायचा असेल तर...

गोव्याहून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटीव्ह टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यातून रेल्वेने येणार्‍या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह येणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत राज्य शासानने (State Government) काढलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिष हेगडे यांनी दिली आहे. यापूर्वी गोवा राज्यातून कर्नाटकात येण्यासाठी कोणतेही निर्बंध नव्हते.

गोवा राज्यातही आता कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कर्नाटक शासनाने (Government of Karnataka) आरटीपीसीआर (RTPCR) सक्ती करण्याचे आदेश रेल्वेच्या हुबळी विभागाला दिले आहेत. त्यानुसार गोव्याहून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटीव्ह टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे.

रेल्वे कर्मचारी याची तपासणी करणार आहेत. नियमितपणे प्रवास करणाऱ्यांना मात्र 15 दिवसातून एकदा आरटीपीसीआर तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.

गोवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना बेळगावात प्रवेश करण्यापूर्वी कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करावा लागणार आहे. गोव्यात देखील कोरोना संसर्ग वाढला असल्याने तसेच कर्नाटकातून गोव्यात ये-जा करणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने सुधारित आदेश बजावत गोव्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांना देखील तपासणीची सक्ती करण्यात आली आहे. रस्ते विमान आणि रेल्वेमार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांना ही सक्ती असणार आहे. राज्य आरोग्य खात्याने () याबाबतचा आदेश बजावला आहे.

खानापूर तहसीलदार प्रवीण जैन यांनी पोलिस आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे. गोव्याला जोडणारा कणकुंबी, हेम्माडगा आणि लोंढा या तिन्ही मार्गांवर आता 24 तास पोलिस व आरोग्य कर्मचारी देखरेख ठेवणार असून, दोन्ही डोस आणि आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असलेल्यांनाच तालुक्यात प्रवेश दिला जावा, अशी सूचना त्यांनी केली.

कर्नाटकमध्ये प्रवेश करताना दोन डोस व आरटीपीसीआर बंधनकारक केल्याने कारवार जिल्ह्यातील माजाळी व अनमोड चेकनाक्यावर तपासणी सुरू केली आहे. अनमोड येथे अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे वाहनधारकांची फजिती झाली व वाहनांच्या रांगा लागल्या. कोरोना चाचणी अहवाल 72 तासांपेक्षा जुना असू नये. अन्यथा तो ग्राह्य धरला जाणार नाही.

व्यापारी, कर्मचारी, शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ही सक्ती करण्यात आली असून दर 15 दिवसातून एकदा त्यांना कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे. दरम्यान, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पाच वर्षांखालील लहान मुले व तातडीची वैधकीय उपचारसाठी येणाऱ्या रुग्णांना या चाचणी अहवालाच्या सक्तीतुन वगळण्यात आले आहे.

आरोग्य खात्याने गोव्यासंबंधी नवा आदेश बजावताना विमानसेवा कंपन्यानी बोर्डिंग पास देण्याआधी प्रवाशाकडे कोरोना चाचणी निगेटीव्ह अहवाल आहे का? हे पाहूनच बोर्डिंग पास देण्याची सूचना केली आहे. रेल्वे आणि बसमध्ये देखील हा चाचणी अहवाल दाखवावा लागणार असून, बेळगाव आणि कारवार जिल्ह्यात स्थापण्यात आलेल्या चेकपोस्टवर आणखी खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT