Goa G20 Meet Dainik Gomantak
गोवा

Goa G20 Summit 2023: रॉस ऑम्लेट, लाल भात, लँब विंडालो, फिश करी... G20 च्या प्रतिनिधींसाठी खास गोवन पदार्थांची मेजवानी

पाहुण्यांसाठी गोमंतकीय संगीत, बासरीवादन देखील

Akshay Nirmale

Goa G20 Summit 2023: गोव्यात आज, सोमवारपासून सुरू झालेल्या G20 बैठकीसाठी विविध पातळ्यांवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधी आणि परदेशी पाहुण्यांसाठी खास गोवन पाहुणचाराचे आयोजन करण्यात आले आहे.

या पाहुण्यांसाठी खास गोमंतकीय पदार्थांची रेलचेल असणार आहे. त्यात रस ऑम्लेट, चिकन झाकुती, लँब विंडालो, फिश कॅल्डाईन, रेक्हेड फ्राईड फिश आणि गोवन करी अशा गोमंतकीय पदार्थांचा समावेश आहे.

याशिवाय खास रिसोटो बारमध्ये गोवन लाल तांदळाचा भात आणि रस ऑम्लेटचे दालन असणार आहे. गोव्यातील विविध प्रकारचे पाव देखील येथे उपलब्ध असणार आहेत. याशिवाय सॅरादुरा, बटिक हे डेझर्टदेखील मेन्यूमध्ये असणार आहेत.

तसेच जगभरातील लोकप्रिय खाद्यपदार्थ देखील उपलब्ध असणार आहेत. यात आशियाई, इटालियन, काँटिनेंटल, भारतीय, पाश्चिमात्य आणि आखाती देशातील पदार्थही या प्रतिनिधींसाठी उपलब्ध असणार आहेत. ग्रील्ड फिश रिसोट्टो देखील असणार आहे.

दरम्यान, यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आहे. त्यानिमित्त नाचणी, मँगो राई, नाचणी फिश मोमो हे पदार्थदेखील असणार आहेत.

गोमंतकीय संगीताद्वारे मनोरंजन

G20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींसाठी 18 एप्रिल रोजी सिदाद द गोवा येथे गाला डिनरवेळी गोमंतकीय कलावंत सोनिया सिरसाट फादो यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच गोमंतकीय म्युझिकही असणार आहे.

समारोपादिवशी 19 एप्रिल रोजीच्या डिनरवेळी स्विझेल कोस्टा आणि त्यांच्या बँडचा कार्क्रम होईल. तसेच सोनिक अरविंद वेलिंगकर यांचे बासरीवादनही होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT