Water Sports in Goa: पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल बायणा आणि बोगमाळो येथील अवैध जलक्रीडा उपक्रमांवर कारवाई करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले आहे. गोव्यातील जलक्रीडा उपक्रमांचे नियमन व देखरेख करण्यासाठी सरकारने जलक्रीडा नियमनासाठी एक धोरण तयार केले आहे.
राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर जलक्रीडा संघटनांद्वारे व्यवस्थापित केलेल्या ‘क्यू-सिस्टम’चे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी अधिसूचित मार्गदर्शक तत्त्वे आहेत, असे खंवटे यांनी सांगितले.
वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी शून्य तासात केलेल्या उल्लेखासंदर्भात उत्तर देताना खंवटे यांनी ही माहिती दिली.
सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये संगीत प्रशिक्षकांची भरती केली होती. परंतु भरतीत पात्र उमेदवारांना डावलून परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांचे गुण वाढवून त्यांना नोकरी देण्याची बेकायदेशीर गोष्ट केली जात आहे.
पुढील विधानसभा अधिवेशनाच्या अगोदर योग्य उमेदवारांना नोकरी देऊन समस्येचे निवारण करावे, असा उल्लेख आमदार विजय सरदेसाई यांनी केला. मुरगाव बंदरावरील फेरी टॅक्सी सेवेसंदर्भात संकल्प आमाेणकर यांनी प्रश्न उपस्थित केला.
वाचनालयात कामाला असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसून त्यांची गैरसोय होत आहे. त्यांना लवकर वेतन देण्यात यावे, असा उल्लेख आमदार वीरेश बोरकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.