Rohan Khaunte, Goa Tourism  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 350 कोटींचे नवे प्रकल्‍प, पर्यटक वाढ; रशियातून विमान; पर्यटनमंत्री खंवटेंनी मांडला लेखाजोखा

Goa Assembly: ३५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांसह मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्‍ही सज्ज आहोत. राज्‍यात यापुढे सप्टेंबरमध्ये ‘जागतिक पर्यटन महिना’ पाळण्यात येईल, अशी घोषणा खंवटे यांनी आज केली.

Sameer Panditrao

पणजी: पर्यटन क्षेत्रात ३५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांसह मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्‍ही सज्ज आहोत. राज्‍यात यापुढे सप्टेंबरमध्ये ‘जागतिक पर्यटन महिना’ पाळण्यात येईल, अशी घोषणा पर्यटनमंत्री खंवटे यांनी केली.

गोवा आणि गॅटविक (यूके) थेट विमानसेवा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होत आहे, अशी माहितीही त्‍यांनी दिली. पर्यटन, छपाई व लेखन सामग्री तसेच माहिती तंत्रज्ञान खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना पर्यटनमंत्र्यांनी विविध मुद्यांना स्‍पर्श केला. ते म्‍हणाले, हॉटेल नोंदणी करण्यासाठी २५ कागदपत्रे लागत होती; पण आता ते सुरू करण्यासाठी दोन ते तीन कागदपत्रे ठेवून परवाने देण्यास सुरुवात केली.

तीन वर्षांत आम्ही ५ हजारांवर नोंदण्या वाढविल्या आहेत. हॉटेल्स पर्यटकांनी गजबजलेली आहेत. विमाने खचाखच भरून गोव्यात येताहेत. कोविडनंतरच्या काळात पर्यटन क्षेत्राची स्थिती सुधारली आहे. एका झटक्यात सकारात्मक बदलांची अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. आम्ही जे प्रयत्न पर्यटनाचा प्रसार आणि प्रचारासाठी सुरू केले आहेत, त्यांना यश येण्यासाठी काही अवधी लागेल असे खंवटे यांनी सांगितले. हे सांगताना “शनैः शनैः पन्थानं गच्छति, प्रयत्नेन विनापि, किं साध्यते” हे सुभाषित त्यांनी उद्धृत केले.

रशियातून आठवडी विमान

१ खंवटे यांनी सांगितले की, राज्याने पोलंड, उझबेकिस्तान आणि कझाकस्तानसारख्या नवीन पर्यटन बाजारपेठांमध्ये प्रवेश केला आहे. उड्डाणे आणि आंतरराष्ट्रीय जाहिरातींमुळे उभय देशांमधील संबंध वृद्धिंगत झाले आहेत. रशियाच्या एकटेरिंनबर्गवरून आठवडी विमान सेवा चालू होत असून १३ हजारांच्या आसपास पर्यटक अपेक्षित आहेत.

२ कोविडपूर्वीच्या पर्यटन आकडेवारीला राज्याने मागे टाकले आहे. जून २०२५ पर्यंतच्या वार्षिक आकडेवारीनुसार, गोव्यात एकूण ५.४५ दशलक्ष पर्यटकांचे आगमन झाले, तर स्थानिक ५.१८ दशलक्ष आणि विदेशातील ०.२७ दशलक्ष पर्यटक आल्याचे दिसून येतात. यावरून एकूण वार्षिक वाढ ८.४ टक्के आहे.

शिवोलीत कायमस्वरूपी सांजाव

युनिटी मॉलचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी १६१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालयालाही केंद्राकडून ९८ कोटी रुपयांसह १२५ कोटी रुपये मिळाले आहेत.

पारंपरिक सांजाव उत्सवाचे कायमस्वरूपी वार्षिक ठिकाण म्हणून शिवोली करण्यात आले आहे.

एकादश तीर्थस्थळे म्हणून ११ मंदिरे निश्चित केली आहेत.

पर्वरीत हायब्रीड आयटी पार्क:

दहावी आणि बारावीच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्यात १० लॅपटॉप देण्यात आले आहेत. प्रलंबित लॅपटॉपचे वाटप पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सामान्य आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा लाभ देण्यासाठी नवीन योजना सुरू केली जाणार असल्याची माहिती व तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. दरम्यान, आयटीचा हायब्रीड पार्क पर्वरीत होईल, असे त्यांनी जाहीर केले.

७५९ जणांना स्टार्टअपचा लाभ

1 गोवा ऑनलाईन पोर्टल आता ४१ सरकारी विभागांकडून २४७ नागरिक सेवा दिली जात आहे.

2 आयटी धोरणांतर्गत ७५९ गोव्यात स्टार्टअप झाले आहेत. त्यांना ४ कोटींचा निधी दिला.

3 १९१ पंचायती इंटरनेटने जोडल्या जाणार आहेत. योजनेसाठी ५० कोटी मिळणार आहेत.

4 ४० मतदारसंघांत १३७ वाय-फाय सेवा सुरू झाली आहे. वाय-फायची रेंज ५० मीटर आहे.

5 सरकारच्या २१० योजनांसाठी पोर्टल ठेवले आहे. १६ विभाग ई-ऑफिस म्हणून प्रशिक्षित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT