Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte : हॉटेल व्यवस्थापनातून रोजगार संधी शक्य ; पर्यटन हब करण्याचा सरकारचा विचार

मंत्री रोहन खंवटे : फोंड्याला पर्यटन हब करण्याचा विचार; इन्स्टिट्यूट प्रकल्पाच्या कामाची पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda : राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देताना गोमंतकीय युवकांना या क्षेत्रात रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी हॉटेल व्यवस्थापनातून रोजगार संधी निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही देताना फोंडा तालुका पर्यटन हब करण्याचा सरकारचा विचार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

फर्मागुढी - फोंड्यातील हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री खंवटे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. गणेश गावकर यांनी केली. या पाहणीवेळी मुख्य अभियंता प्रमोद बदामी व कन्सल्टंट रवीशंकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

चार महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असे खंवटे यांनी सांगितले. ‘पर्यटन खाते व पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनाला चालना देतानाच गोमंतकीय युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची आवश्‍यकता आहे.

त्यासाठी गावकर यांच्याशी चर्चा झाली असून हॉटेल व्यवस्थापनातून पर्यटनात जास्त रोजगार संधी आहेत, त्याचा लाभ या प्रकल्पात शिकून आणि प्रशिक्षणाद्वारे घ्यावा, असे खंवटे म्हणाले.

दरवर्षी 320 विद्यार्थी प्रशिक्षित

फर्मागुढीतील या हॉटेल व्यवस्थापन इन्स्टिट्यूटद्वारे दरवर्षी किमान 320 विद्यार्थी प्रशिक्षित केले जाणार आहेत. या प्रशिक्षणात पूर्णपणे गोमंतकीय विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल. प्रथम प्राधान्य गोमंतकीय विद्यार्थी असेल असे सांगताना गोमंतकीय युवकांना रोजगाराच्या संधीसाठी हॉटेल मॅनेजमेंटद्वारे विविध क्षेत्रात रोजगारासाठी प्रशिक्षित केले जाईल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

फर्मागुढी किल्ल्याला देणार प्राधान्य

फर्मागुढीतील गोपाळ गणपती देवस्थानासमोरील शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या पूनर्बांधणीसह पर्यटनाला आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार बांधील आहे. गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे या किल्ल्याचे काम सुरू केले जाणार आहे. पर्यटनासाठी आवश्‍यक सुविधा पर्यटकांना या ठिकाणी उपलब्ध केल्या जातील आणि त्यातूनच पर्यटनाला चालना देण्यात येईल, असेही रोहन खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

Bull Fight Viral Video: रस्त्यावर जनावरांचा थरार अन्...! बैलाची स्कूटीला जोरदार धडक; अंगावर काटा आणणार व्हिडिओ तूफान व्हायरल

Goa RGP: 'गोमंतकीयांचे हित जपणारे सरकार हवे'; बोरकरांचा निर्धार! 'आरजी'च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

SCROLL FOR NEXT