Rohan Harmalkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: कुंभारजुवेमधून रोहन हरमलकर अपक्ष लढणार

कुंभारजुवे येथून जेनिता पांडुरंग मडकईकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपने आज (बुधवार) दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली. 34 उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उरलेल्या 6 जागांसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. उमेदवारी न मिळाल्याने काही नेत्यांनी नाराज होऊन पक्षाला रामराम ठोकला होता. यामध्ये प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) आणि उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा समावेश होतो. (Goa Election Cumbarjua Rohan Harmalkar Latest News)

यातच आता भाजपकडून (BJP) तिकीट नाकारण्यात आल्याने रोहन हरमलकर कुंभारजुवें मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. कुंभारजुवे येथून जेनिता पांडुरंग मडकईकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. यामध्ये 40 मतदारसंघांपैकी 34 मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी त्या यादीने गोव्याच्या राजकारणात अत्यंत खळबळ माजवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT