Rochelle Pinto Vogue India Dainik Gomantak
गोवा

"गोवा हे तरुण मुलींना वाढण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण"! रोशेल पिंटोंचे प्रतिपादन; मीडिया करिअरबाबत केले मार्गदर्शन

Rochelle Pinto Vogue India: ‘व्होग इंडिया’ च्या संपादकीय सामग्री-प्रमुख असलेल्या रोशेल पिंटो यांच्या मते, गोव्यात असलेले बहुसांस्कृतिक वातावरण हे स्त्रियांच्या दृष्टीने एक परीने फायद्याचे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

‘व्होग इंडिया’ च्या संपादकीय सामग्री-प्रमुख असलेल्या रोशेल पिंटो यांच्या मते, गोव्यात असलेले बहुसांस्कृतिक वातावरण हे स्त्रियांच्या दृष्टीने एक परीने फायद्याचे आहे. गोव्यात महिलांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानले जात नाही. त्या म्हणतात, ‘गोवा हे तरुण मुलींना वाढण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील महिला खूप सक्षम आहेत; मी स्वतः गोव्यात वाढली आहे आणि त्यामुळे माझ्या प्रबळ आत्मविश्वासाची भावना आहे.’

‘महिला नेतृत्व : मीडियामध्ये करिअर कसे बनवावे'' या शीर्षकाच्या कार्यक्रमात रोशेल पिंटो बोलत होत्या.‌ क्लब टेनिस डी गॅास्पर डायसच्या शताब्दीपर कार्यक्रमात, फॅशन डिझायनर सिमरन धोंड यांनी त्यांच्याशी संवाद साधला. रोशेल यांनी आपल्या वयाच्या अकराव्या वर्षी ऑल इंडिया रेडिओवर, बाल रेडिओ जॉकी म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती.

‘गोव्यात आपल्याकडे असलेली आणि आपण साजरा करत असलेली विविधतेची भावना यामुळे आपले जग जवळजवळ एखाद्या परीकथेसारखे दिसते. ते जपण्यासाठी आपण सर्वांनी लढले पाहिजे'' असे त्यांनी यावेळी सुचवले. 

फॅशन मीडियाचा भाग असूनही रोशेल फॅशनच्या जगात वाढली नाही. हा तिच्या दृष्टीने सुदैवाचा भाग होता असे तिला वाटते. ती सध्या मुंबईत राहते आणि प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा तिला पंधरापेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे.

ट्विक इंडिया आणि कोंडे नास्त ग्रुप यासारख्या ब्रँडसोबत तिने काम केले आहे. ती बहुसंस्कृतिक वातावरणात वाढली असल्याने तिच्या मनात नेहमीच ''कुतूहल'' हा भाग प्रभावी होता. तिच्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे हे देखील ती कबूल करते.

इटलीतील इन्स्टिट्यूटो मारन्गोनी आणि मुंबईतील सेंट पोल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड एज्युकेशनमध्येही तिने शिकवले आहे.ती गोव्यात वाढली असल्याकारणाने तिच्या मीडिया कारकिर्दीला कसा आकार मिळाला हे तिने आपल्या व्याख्यानात सांगितले.‌ तिने स्पष्ट केले की गोव्यातील वातावरणात वाढल्याने ती व्यक्तींना समजू शकते आणि त्यांच्याशी मानवी पातळीवर संवाद साधू शकते. 

मीडियामध्ये असण्यासाठी केवळ प्रतिभा असणे पुरेसे नाही. नैतिकता आणि लवचिकता हाही तिथला मुख्य भाग असतो आणि टीका स्वीकारण्यासाठी जाड त्वचा आणि शंभर टक्के योगदान देण्याची क्षमता महत्त्वाची असते, असे ती युवकांना सल्ला देताना म्हणाली.‌

''तुम्हाला सर्व काही करायला शिकले पाहिजे कारण त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो आणि तुम्ही नेमके काय करत आहे हे तुम्हाला कळते,'' असे तिचे म्हणणे होते. ''पत्रकार हा गिधाडासारखा असतो; इतरांना जिथे मृतदेह दिसतो तिथे आपल्याला पोटभर जेवण दिसते ही जर तुमची मानसिकता असेल तर तुम्हाला कुठेही कथा सापडेल'' असे ती पुढे म्हणाली.

मीडिया उद्योगातील एआयच्या आक्रमणाबद्दल बोलताना रेशेल यांनी निदर्शनास आणून दिले की नव्या तंत्रज्ञानाची भीती नवीन नाही. प्रिंटिंग प्रेसच्या शोधापासून आपण ती अनुभवत आहोत. ‘लेखकांना त्यात तगून राहण्यासाठी त्यांचे कौशल्य विकसित करावे लागेल. कदाचित ते लिहिणार नाहीत कारण माध्यम बदललेले असेल. त्याची काळजी मला नाही पण माझी कला सुधारण्यासाठी आणि स्वतःला व्यक्त करण्याच्या नवीन संधी मिळण्यासंबंधी मी अधिक उत्साही आहे.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT