Fish selling near Siolim-Chopdem road  Dainik Gomantak
गोवा

Siolim News: चोपडे-शिवोलीत रस्त्याबाजूला मासे विक्री करणाऱ्यांना हटविले

Siolim News: स्थानिक पंचायत मंडळाशी चर्चा करून नवीन जागा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जाणार असल्याचे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Siolim-Chopdem News: शिवोली,चोपडे-शिवोली येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला बसून रात्री उशिरापर्यंत मासे विक्री करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांना हणजूण पोलिसांनी समज देऊन तेथून हटविले.

स्थानिक लोकांनी याबाबतीत तक्रार केल्यानेच ही कारवाई करावी लागली, असे हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, येथील रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मच्छीमारांना सायंकाळी मासे विक्री करण्यासाठी स्थानिक पंचायत मंडळाशी चर्चा करून नवीन जागा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जाणार असल्याचे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले.

स्थानिक पंचायत मंडळानेही या गोष्टीला दुजोरा दिला.

शिवोली-चोपडे पुलापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने या भागात मासे विक्री करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांना काही काळासाठी तेथून हटवावे लागले.

परंतु रस्त्याचे काम पूर्ण होताच कुठल्याही परिस्थितीत त्यांची या भागातच सोय करण्यात येईल. पोलिसांनी केवळ स्थानिक लोकांवरच कारवाई न करता परप्रांतीय मासेविक्रेत्यांवरही अशीच कारवाई करावी.

- अभय शिरोडकर, सरपंच, मार्ना-शिवोली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT