Minister Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Marcel News: माशेलातील रस्त्यांचे लवकरच डांबरीकरण करणार : गावडे

Marcel News: त्यानंतर पुन्हा रस्ते फोडले जाणार नाही, असे मंत्री गोविंद गावडे यांनी माशेलात विकास कामांच्या उद्‍घाटनप्रसंगी स्पष्ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Marcel News : माशेल पंचक्रोशीतील सर्व रस्त्यांचे लवकरच डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खणलेले रस्ते दुरुस्त होणार आहे.

ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारच्या भूमिगत वाहिन्यांची जोडणी घ्यायची असेल तर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यापूर्वी करावी.

त्यानंतर पुन्हा रस्ते फोडले जाणार नाही, असे मंत्री गोविंद गावडे यांनी माशेलात विकास कामांच्या उद्‍घाटनप्रसंगी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सरंपच विशांत नाईक, जयेश नाईक व इतर पंच उपस्थित होते.

जलवाहिनी जोडण्यासाठी वारंवार रस्ते मधोमध तोडले जातात. शिवाय इतरही कामासाठी रस्ते खणले जातात.

यंदा डांबरीकरण झाल्यानंतर दोन वर्षे तरी रस्ते पुन्हा खोदण्यात, तोडफोड करण्यावर बंदी घातली जाणार आहे.

कारण सर्व रस्ते दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे. एकदा डांबरीकरण केलेले रस्त्यावर पुन्हा वेगवेगळ्या वाहिन्यांसाठी खोदकाम करणे चुकीच आहे.

आपल्याकडे काही दिवस आहे, जर का आपल्याला एखादी भूमिगत वाहिनी हवी असेल, टाकायची असेल तर त्यांची तरतूद महिनाभरात करावी, असे आवाहनही मंत्री गावडे यांनी आज केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT