Roads in Pernem taluka are still rocky Dainik Gomantak
गोवा

पेडणे तालुक्यातील रस्ते अजूनही खड्डेमय

राज्यातील एकाही रस्त्यावर 19 नोव्हेंबर नंतर एकही खड्डा दिसणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

मोरजी: राज्यातील एकाही रस्त्यावर 19 नोव्हेंबर नंतर एकही खड्डा दिसणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. आज 15 मार्च उजाडला परंतु मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पेडणे तालुक्यातील विविध रस्त्यांवर आजही खड्डे दिसून येतात. पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ महाखाजन पर्यंत राष्ट्रीय महामार्ग 66 चे काम जोरात सुरू आहे. परंतु गावात जाणारे अंतर्गत आणि सर्व्हिस रस्ते अजून केलेले नाहीत. धारगळ कासारवर्णे रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे वाहतुकीलाही धोकादायक ठरत आहेत.

मालपे धारगळ सुकेकुरण आणि बैलपार चांदेल कासारवर्णे या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांना खड्डे पडलेले दिसून येतात. हे खड्डे बुजवण्यासाठी आजवर सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाने प्रयत्न केलेले नाहीत. त्यावर गेल्यावर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 19 नोव्हेंबर नंतर एकही खड्डा रस्त्याला दिसणार नाही, आणि खड्डे असतील तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित अभियंत्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.

या गोष्टीला जवळजवळ चार महिने उलटले. तरी आजही खड्डे आहेत, तसेच आहेत. उलट त्यांचे आकार वाढले आहेत. खड्‌ड्यांबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर काही प्रमाणात खड्डे बुजवून डोळ्यांना पाने पुसण्याचे काम बांधकाम खात्याने केले आहे.

खड्ड्यांचा आकार वाढला

पेडणे तालुक्यातील धारगळ सुकेकुरण मालपे विर्नोडा कासारवरणे बैलपार ठिकाणी आणि रस्त्याला ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येतात. हे खड्डे बुजवावेत, अशी गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी आहे. परंतु बांधकाम खात्याने याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने खड्डे मोठे झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suleman Khan: कोठडीतून पलायन प्रकरण! कॉन्स्टेबलसहित सुलेमान खानवर आरोप निश्चित

Goa News: ‘त्या’ निवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन द्या! फौजदारी खटलाप्रकरणी गोवा खंडपीठाचा आदेश

Goa Crime: गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालणारा ठग सापडला, मुंबईत आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेला मोठे यश

Mhaje Ghar: गोमंतकीयांना परवडणारे ‘माझे घर’ देणार! CM सावंतांचे आश्वासन; ‘गृहनिर्माण’कडून आराखड्याचे काम सुरू

Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहा टक्‍के गुण मिळवणारेही होणार उत्तीर्ण; वाचा संपूर्ण माहिती..

SCROLL FOR NEXT