Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Pilerne Road Widening: पीर्णातील रस्ता रुंदीकरण 'परप्रांतीयांसाठी'? मनोज परब यांचा सरकारवर निशाणा, स्थानिकांना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा केला आरोप

Manoj Parab: पीर्ण गावातील नागरिकांनी १० ते २५ मीटर रस्ता रूंदीकरणाची मागणी कधीच केली नाही. परप्रांतीय तसेच हॉटेल व्यवसायिकांच्या हितासाठी रस्ता रूंदीकरण केलं जातंय, असं मनोज परब म्हणालेत.

Sameer Amunekar

पणजी: पीर्ण गावातील नागरिकांनी १० ते २५ मीटर रस्ता रूंदीकरणाची मागणी कधीच केली नाही. रस्ता रूंदीकरण केल्याने पीर्णतील घरे, मंदिर, चर्च तर कुणाचे तुळशी वृंदावन, काहींची संरक्षक भिंत जाण्याचा धोका आहे, असे असताना परप्रांतीय तसेच हॉटेल व्यवसायिकांच्या हितासाठी रस्ता रूंदीकरण करून स्थानिकांना त्रास देण्याचा प्रयत्न असून याला आमचा विरोध राहिल,असे प्रतिपादन ‘आरजी’ चे अध्यक्ष मनोज परब यांनी केले.

पणजी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परब म्हणाले, या प्रकरणी चर्चा करण्यासाठी ज्यावेळी स्थानिक आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना बोलाविण्यात आले, त्यावेळी ते आले नाहीत. सरपंच संदीप तानावडे देखील गंभीर नाहीत.

हे दोघेही पीर्णचा विद्‍ध्वंस करतील. त्यासोबतच,आमदार विजय सरदेसाई आणि खासदार विरियातो फर्नांडिस यांनी पीर्ण गावांत येऊन राजकारण करू नये, असेही त्यांनी सांगितले.

तर रस्त्यावर उतरावे लागेल!

गावातले अनेक नागरिक आता इतरत्र स्थायिक झाले आहेत, असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात रूंदीकरण का? हा विकास नेमका कुणाच्या भल्यासाठी ? असा प्रश्‍न स्थानिक विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी पीर्ण बायपास रस्ता समितीची बैठक झाली.

जेथून बायपास रस्ता जाणार आहे तेथे स्थानिकांच्या बागायती आहेत त्यामुळे त्या रस्त्याला देखील विरोध असून नागरिकांना हा प्रश्‍न हळर्णकर सोडवतील, असे वाटत होते. परंतु जर हा पश्‍न सुटला नाही तर आता रस्त्यावर उतरावे लागेल, असे मनोज परब यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT