Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accidents: चिंताजनक! गोव्यात अपघातात दर आठवड्याला 5 जणांचा बळी

Goa road accidents: वर्ष २०२४ संपायला फक्‍त एक दिवस बाकी असताना राज्‍यातील रस्‍त्‍यांवरील बळींच्‍या संख्‍येने पावणे तीनशेचा आकडा पार केला आहे.

Sameer Panditrao

Accidental Deaths In Goa

मडगाव: वर्ष २०२४ संपायला फक्‍त एक दिवस बाकी असताना राज्‍यातील रस्‍त्‍यांवरील बळींच्‍या संख्‍येने पावणे तीनशेचा आकडा पार केला आहे. यंदा २९ डिसेंबरपर्यंत रस्‍तेअपघातांत २७६ जणांचा मृत्‍यू झाला आहे. तरीही गतसालच्‍या तुलनेत ही संख्‍या बरीच कमी आहे. मागच्‍या वर्षी (२०२३) ३१ डिसेंबरपर्यंत २९१ जणांना अपघातांत प्राण गमवावे लागले होते.

यंदाच्‍या वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल याबद्दल काहीसे चिंतेचे वातावरण आहेच. या दिवशी अपघात नियंत्रणात रहावेत यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. रात्रीच्‍या वेळी दारू पिऊन वाहने चालवू नका, असे आवाहन त्‍यांनी केले आहे. यंदा १ जानेवारी ते २९ डिसेंबर या काळाचा आढावा घेतल्‍यास राज्‍यात दरदिवशी सात ते आठ अपघात व दर आठवड्याला पाच ते सहा बळी गेले आहेत.

हे मृत्‍यूंचे प्रमाण ३१व्‍या तासाला एक असल्‍याचे दिसून आले आहे. यंदा १ जानेवारी ते २९ डिसेंबर या कालावधीत गोव्‍यात २६५२ अपघातांची नोंद झाली. त्‍यातील २६२ अपघात गंभीर होते. त्‍यात २७६ जणांचा बळी गेला आहे. असे असले तरी मागच्‍या वर्षाच्‍या तुलनेत अपघातांचे प्रमाण ५.५४ टक्‍क्‍यांनी तर मृत्‍यूंचे प्रमाण १ टक्‍क्‍याने कमी झाले आहे.

ही आहेत प्रमुख कारणे

अतिवेगाने वाहने हाकणे, दारूच्या नशेत वाहने चालविणे, बेफिकीर वृत्तीने वाहने हाकणेस सदोष रस्‍ते

नियंत्रणासाठी याची गरज

रस्‍तासुरक्षा जागृती, वेगावरील नियंत्रणासाठी उपाय, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT