Ro-Ro Ferry In Goa Dainik Gomantak
गोवा

Ro-Ro Ferry In Goa: गाजावाजा करत सुरू केलेली 'रो-रो फेरीबोट' सेवा 15 दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर, प्रवाशांना नाहक मन:स्ताप

Goa Chodan Ro-Ro Ferry: चोडण - रायबंदर जलमार्गावर मोठा गाजावाजा करत सुरू केलेली रो - रो फेरीबोट सेवा अवघ्या पंधरा दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

Sameer Amunekar

तिसवाडी: चोडण - रायबंदर जलमार्गावर मोठा गाजावाजा करत सुरू केलेली रो - रो फेरीबोट सेवा अवघ्या पंधरा दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. या जलमार्गावर वाहतूक करणारी गंगोत्री ही फेरीबोट नादुरुस्त झाल्याने दोन दिवसांपासून नांगरून ठेवली आहे.

त्यामुळे या मार्गावरील इतर फेरीबोटींवर बराच ताण पडत असून वाहनांच्या मोठ्या रांगा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही धक्क्यांवर लागत आहेत.

सध्या एकच रो - रो फेरीबोट असल्याने त्यातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. मंगळवारी सकाळी ओहोटीच्या वेळी गंगोत्री ही फेरीबोट चोडण धक्क्यावर अडकून पडली.

या फेरीबोटीचा पंखा धक्क्याजवळील मोठ्या दगडाला लागल्याने पंखा नादुरुस्त झाला. त्यामुळे ही फेरीबोट नांगरून ठेवावी लागली आहे.

यावर उपाय म्हणून नदी परिवहन खात्याने जुन्या तीन फेरीबोटी सुरू केल्याने या मार्गावरील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंग राजेभोसले यांनी सांगितले, की या रो - रो फेरीबोटीचे दुरुस्ती काम युद्ध पातळीवर सुरू केले असून गुरुवारपासून ही फेरीबोट सुरू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT