Chodan Raibandar Ro-Ro Ferry Dainik Gomantak
गोवा

Chorao Raibandar Ro-Ro Ferry: प्रतिक्षा संपली! रो-रो फेरीबोट ‘द्वारका’ चोडणला दाखल; 1 जूनपासून येणार सेवेत

Chorao Raibandar Ro-Ro Ferry: या मार्गावर दोन फेऱ्या मारल्यानंतर तासाभराने ही फेरीबोट पणजीकडे रवाना झाली. ही चाचणी सतत पाच दिवस चालू राहणार असल्याचे या फेरीबोटीमधील कर्मचाऱ्याने सांगितले.

Sameer Panditrao

तिसवाडी: चोडण-रायबंदर जलमार्गावर गेले वर्षभर आज येणार, उद्या येणार म्हणून चर्चेत असलेल्या दोन रो-रो फेरीबोटींपैकी ‘द्वारका’ नामक एक रो-रो फेरीबोट मंगळवारी दाखल झाली. संध्याकाळी ५.३० वाजता या जलमार्गावर या रो-रो फेरीबोट चाचणी घेण्यात आली.

या मार्गावर दोन फेऱ्या मारल्यानंतर तासाभराने ही फेरीबोट पणजीकडे रवाना झाली. ही चाचणी सतत पाच दिवस चालू राहणार असल्याचे या फेरीबोटीमधील कर्मचाऱ्याने सांगितले.

सरकारने प्रचंड वाहतूक असलेल्या या जलमार्गावर रो-रो फेरबोटी सुरू करण्याची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती. वर्षभराने पहिली रो-रो फेरबोट दाखल झाल्याने या मार्गावरील प्रवासी उत्साहित झाले आहेत. ही सेवा नियमित सुरू झाल्यानंतर प्रवाशांचे अधिक सोयीचे होणार आहे.

दोन्ही रो-रो फेरीबोटी १ जूनपासून सेवेत

येत्या १ जूनपासून दोन्ही रो-रो फेरीबोटींची सेवा सुरू होईल, असे नदी परिवहन खात्याचे अधिकारी विक्रमसिंग भोसले यांनी सांगितले.

या फेरीबोटींत १५ ते १७ चार चाकी वाहने, ४० ते ५० दुचाकी व १०२ आसन व्यवस्था आहे.

या फेरीबोटींना दोन्ही बाजूने दरवाजे असल्याने एका बाजूने गाड्या आत येण्यासाठी व दुसऱ्या बाजूने बाहेर जाण्यासाठी सोय आहे.

या फेरीबोटी विजय मरिन या कंपनीने बांधल्या आहेत.

या फेरीबोटींची प्रत्येकी किंमत १२ ते १५ कोटी आहे.

चोडण मार्गावरील या सेवेसाठी वाढीव शुक्ल न आकारता पूर्वीचेच शुल्क आकारण्यात येणार आहे.

पाच दिवसांत होणाऱ्या चाचणी फेरीत या फेरीबोटीत काय उणीव आहे, याची कल्पना नदी खात्याला येईल, असे भोसले यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT