rivona electricity accident Dainik Gomantak
गोवा

Rivona: 2 भावांचा दुर्दैवी मृत्यू! 'ते' कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडू नये याची काळजी घ्या; आमदार सिल्वांची मागणी

Rivona Brothers Death: सिल्वा यांनी अशा अपघातांना आळा घालण्यासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था व सुधारणा अंमलात आणण्याची मागणी केली. लोकांची सुरक्षितता हे सरकारचे प्राधान्य असले पाहिजे.

Sameer Panditrao

मडगाव: रिवण येथे विजेचा धक्का बसून मृत पावलेल्या गावकर बंधूंच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी कडक सुरक्षात्मक सुधारणा करावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी केली आहे.

सिल्वा म्हणाले, की गावकर कुटुंबास नुकसान भरपाई देण्यास विलंब होता कामा नये. शोकाकुल कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडू नये, यासाठी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने पार पाडली पाहिजे.

सिल्वा यांनी अशा अपघातांना आळा घालण्यासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था व सुधारणा अंमलात आणण्याची मागणी केली. लोकांची सुरक्षितता हे सरकारचे प्राधान्य असले पाहिजे, असे ते म्हणाले.

या घटनेत झालेल्या निष्काळजीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशीही त्यांची मागणी आहे. त्यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आवाहन केले. सिल्वा यांनी गावकर कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व अशा कठीण काळात ‘आप’ पक्ष त्यांच्यासोबत ठामपणे उभा असल्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'म्हजे घर'बाबतीत नवी अपडेट! सुनावणी 1 एप्रिलपर्यंत लांबणीवर; याचिकाकर्त्याच्या पात्रतेवर सरकारचा आक्षेप

Human Wildlife Conflict Goa: मानव-वन्‍यप्राणी संघर्ष टाळण्‍यासाठी धोरण! कर्नाटक, केरळच्‍या मॉडेलचा अभ्‍यास करणार असल्‍याची माहिती

Savitribai Phule: विरोधाचे उंबरठे ओलांडून नव्या क्रांतीला जन्म देणाऱ्या 'सावित्रीबाई', वाखाणण्याजोगे शैक्षणिक योगदान

Sanju Samson: 'तो' केवळ सामने जिंकत नाही, लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची हिंमत देतो; स्वप्न, संघर्ष अन् सातत्याची कथा

VIDEO: बापरे! वीज कार्यालयातील छताचा भाग कोसळला खाली; म्हापशातील घटनेने चिंतेचे वातावरण

SCROLL FOR NEXT