घोटेली 2 येथे आलेले वाळवंटी पुराचे पाणी Dainik Gomantak
गोवा

Rain Update: भर पहाटे घोटेली, मोर्ले, पर्येत शिरले पाणी; लोकांची धांदल

काल रात्रभर आणि आज पहाटे चोर्ला घाट आणि परिसरात पुन्हा पावसाचा तडाखा बसल्याने भर पहाटे घोटेली-मोर्लेतून वाहणारी वाळवंटी नदीला मोठा पूर आला.

दैनिक गोमन्तक

पर्ये: काल रात्रभर आणि आज पहाटे चोर्ला घाट आणि परिसरात पुन्हा पावसाचा तडाखा बसल्याने भर पहाटे घोटेली-मोर्लेतून वाहणारी वाळवंटी( river valvonti flowing through ghoteli 2, morlem, poriem ) नदीला मोठा पूर आला. या पुराचे पाणी घोटेली, मोर्ले, पर्ये आदी भागातून वाहू लागले. काल दिवसभर पाऊस पडत असल्याने वाळवंटीच्या पुराचा धसका लोकांना होताच. आज पहाटेच याचा तडाखा बसल्याने लोकांची एकच धांदल उडाली. सकाळी पहाटे पाचच्या सुमारास हा पूर आला त्यामुळे लोकांनी याची धास्ती घेतली. (River valvonti flowing through ghoteli 2, morlem, poriem in goa)

River valvonti flowing

घोटेलीत शिरले पाणी

घोटेली गाव हा सतत वाळवंटी नदीच्या छायेखाली असतो. याचाच प्रत्यय आज पहाटे पुन्हा या ग्रामस्थांना झाला. पहाटे या नदीचे पाणी येथील संरक्षक भिंत ओलांडून गावात आले तसेच गावातील पुलावरून गावात आले. त्यामुळे इथल्या काही घरांच्या बाजूने हे पाणी वाहू लागले. यापैकी विठ्ठल गावस यांच्या घरात घुसले. त्यांना यांची मोठी नुकसान झाली आहे.

River valvonti flowing

मोर्ले-पर्येत पूर

याच वाळवंटी नदीच्या खालच्या पात्रात असलेल्या मोर्ले, पर्ये येथील नदी काठच्या भागात पाणी शिरल्याने मोठी नुकसान झाली आहे. नदीचे पाणी इथल्या शेती बागायतीतून जात असल्याने मोठी नुकसान झाली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

Goa Tourism: पर्यटन हंगामास सुरुवात; विदेशी पर्यटकांची संख्या घटली, देशी पर्यटकांत वाढ

Goa Crime: 45 दिवसांत 10 अल्‍पवयीनांची अपहरणे, दक्षिण गोव्यात घर सोडून जाण्याचे प्रकार वाढले

Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT