River Rafting Goa Dainik Gomantak
गोवा

River Rafting Goa : उस्तेच्या नदीपात्रात जलक्रीडांचा थरार सुरू

पर्यटक उत्साही : नगरगाव पंचायतीला महसूलप्राप्ती; स्थानिकांनाही रोजगार

गोमन्तक डिजिटल टीम

River Rafting Goa : सत्तरी तालुक्यात नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील उस्ते गावातून पर्यटन विकास महामंडळातर्फे व्हाईट वॉटर राफ्टिंग या साहसी जलक्रीडा खेळाला नुकतीच सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून बोटीची पूजा करून खेळाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच रामू खरवत, पंच राजेंद्र अभ्यंकर आदींची उपस्थिती होती.

स्व. मनोहर पर्रीकर यांनी जलखेळांचे उद्‌घाटन २०१२ साली केले होते. पर्यटकांना वाळपईतून वाहनाची चोख व्यवस्था केली जाते. सकाळी ९.३० वाजता व दुपारी २.३० वाजता अशा दोन सत्रांत हा खेळ खेळला जातो. भाजप सरकारने सुरू केलेला हा जलसाहसी प्रकल्प चांगला ठरत आलेला आहे. यातून काही प्रमाणात नगरगाव पंचायतीला महसूलही प्राप्त होतो आहे, असे सरपंच संध्या खाडीलकर यांनी सांगितले.

पंच राजेंद्र अभ्यंकर म्हणाले की, व्हाईट वॉटर राफ्टिंगचा स्थानिक वाहनधारक व्यावसायिकांना चांगला फायदा होतो आहे. गाडीचे भाडे मिळून रोजगार मिळतो आहे. तसेच स्थानिक हॉटेल्स व्यावसायिकांनाही जेवणाच्या माध्यमातून लाभ झालेला आहे.

योग्य सुरक्षा, मार्गदर्शन

या जलक्रीडेसाठी अगदी साहसी अनुभवी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. पर्यटकांना सुरक्षेसाठी हेल्मेट, अंगात परिधान करण्यास जॅकेट दिले जाते. तसेच जलक्रीडेवेळी कोणत्या गोष्टींची पाळणूक करावी लागते याची माहिती सुरवातीला दिली जाते. या खेळावेळी म्हादई नदीचे सौंदर्य, वनराई, उंच झाडांचा नजराणा, जलद वाहणाऱ्या फेसाळयुक्त पाण्याचा थरारक अनुभव घेता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT