Goa Theft Case : गोव्यातून चोरलेली पाच वाहने कोल्हापूर येथून जप्त

पणजी पोलिसांची कारवाई : संशयित करत होता बनावट ओळखपत्रांचा वापर; आवळल्‍या मुसक्‍या
Goa Theft Case
Goa Theft Case Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : गोव्यातून ‘रेंट ए बाईक’ या भाडेपट्टीवरील दुचाकी वारंवार भाडेपट्टीवर घेऊन त्या लंपास करणारा कोल्हापूरचा अट्टल दुचाकीचोर संशयित सद्दाम जमादार याच्याकडून ४ स्कुटर्स व १ मोटारसायकल मिळून पाच दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. बनावट वाहन परवाना किंवा आधारकार्डचे ओळखपत्र देऊन तो या दुचाकी घेऊन जात होता व त्या परत करत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी रेंट ए बाईक मालकांच्या मदतीने पणजीत सापळा लावून त्याला शिताफीने अटक केली व ही वाहने जप्त केली.

पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सद्दाम जमादार याच्याविरुद्ध कळंगुट परिसरातून ६ दुचाकी वाहने चोरल्याचा गुन्हा नोंद आहे. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्यानंतर पुन्हा त्याने रेंट ए बाईक भाडेपट्टीवर घेऊन गायब होण्‍याचा तसेच त्या कोल्हापूर येथे ऑनलाईन मार्केटप्लेस ओएलएक्स ॲपवरून तो विकत होता. यातील त्याने तीन दुचाकी प्रत्येकी ६० हजारांना कोल्हापूर येथे बनावट दस्तावेज तयार करून विकल्या होत्या त्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचे लक्ष्य नव्या दुचाकी वाहने भाडेपट्टीवर घेऊन त्याची विक्री करण्याचे होते.

Goa Theft Case
Goa Assembly Monsoon Session 2023: सत्ताधारी -विरोधकांना चर्चेसाठी समान वेळ!

पणजीतून रेंट ए बाईक मालकांची दुचाकी वाहने भाडेपट्टीवर घेऊन ती दिलेल्या मुदतीत परत केली जात नसल्याने तसेच संपर्क साधल्यास मोबाईल फोनही घेत नसल्याच्या तक्रारी पणजी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या दुचाकी मालकांना भाडेपट्टीवर दुचाकी वाहने मागण्यास येणाऱ्या व त्याचा संशय आल्यास माहिती देण्याचे आवाहन केले होते. गेल्या ५ जुलैला संशयित सद्दाम जमादार हा पाटो - पणजी येथील रेंट ए बाईक कार्यालयात येऊन ६जी ॲक्टिव्हा दुचाकी भाडेपट्टीवर हवी असल्याचे सांगितले. त्याने दुचाकीची चावी घेऊन तो पसार झाला. त्याचा पाठलाग केला असता तो दुचाकीसह खाली पडला व त्याला पोलिसांच्या त्याब्यात देण्यात आले होते. तेव्हा त्याने चार स्कुटर्सची चोरी केल्याची कबुली दिली होती.

Goa Theft Case
Goa Rajyasabha Poll 2023: राज्यसभा निवडणुकीसाठी विरोधकांची ठरवली 'ही' स्ट्रॅटेजी!

ओएलएक्स’वरून जप्ती

पणजी पोलिस स्थानकाचे पथक संशयित सद्दाम जमादार याला घेऊन कोल्हापूरला गेले होते. त्याने ऑनलाईनवरून ओएलएक्स या मार्केटप्लेस ॲपच्या आधारे विकलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर इतर दोन दुचाकीसाठी त्याला ग्राहक न मिळाल्याने त्याने स्वतःकडे ठेवल्या होत्या. त्या ताब्यात घेतल्या आहेत. ही वाहने कोल्हापूर तसेच सातारा येथून जप्त करण्यात आली आहेत. वाहनांचे रजिस्ट्रेशन बदलून व त्याचे बनावट कागदपत्रे करून तो विकत होता. त्याने इतर भागातून चोरी केली आहे का याचाही शोध घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com