Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘काँग्रेस’नेच दिला माहितीचा अधिकार; युरी आलेमाव

Goa Politics: युरी आलेमाव : भाजपमध्ये पारदर्शकतेचा अभाव

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

15 मार्चपर्यंत इलेक्टोरल बाँड्सची सर्व माहिती सार्वजनिक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत असून लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते. जनतेला माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे.

काँग्रेस सरकारने माहिती हक्क कायदा-२००५ लागू करून नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार दिले, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

12 मार्च 2024 च्या कामकाजाचा वेळ संपण्यापूर्वी भारतीय स्टेट बँकेला निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील देण्याचे निर्देश देणाऱ्या तसेच 15 मार्चपर्यंत सदर तपशील भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना, आलेमाव यांनी भाजपमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला.

भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांत देशातील प्रत्येक संस्था उद्ध्वस्त केली. हे अत्यंत धोकादायक आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

लोकशाहीचे रक्षण करा

मी पुन्हा एकदा गोमंतकीयांना नम्रपणे आवाहन करतो की, त्यांनी भाजपचे कुटील डाव ओळखावेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवावा. हुकूमशहांच्या तावडीतून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे युरी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT