Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; गोंयकारपणाची ऐशी-तैशी

Khari Kujbuj Political Satire: पोलिस खात्याकडे आता भरपूर मनुष्यबळ तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीही आहे, मग गोव्यात गुन्ह्याचे प्रमाण दिवसागणिक का वाढत आहे, असा प्रश्न लोकांना पडला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोंयकारपणाची ऐशी-तैशी!

गोंयकारपणाचा मुद्दा घेऊन आरजी व फॅारवर्ड यांची आगामी निवडणुकीत युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर अन्य कोणाची नसली तरी काँग्रेसची अडचण होऊ शकते, असे राजकीय निरीक्षक म्हणतात, कारण गत विधानसभा निवडणुकीत ‘तृणमूल’ असो वा ‘आप’ असो यांच्या उपस्थितीचा सर्वाधिक फटका काँग्रेसलाच बसला होता. यंदाही तसेच होईल, असे काहीजण मानतात, पण काँग्रेसवाल्यांना ते मान्य नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यापूर्वी म्हणजे ऐशी व त्यानंतरच्या दशकांत गोमंत लोक पक्षासारख्या संघटना स्थानिकांचे मुद्दे घेऊन रिंगणात होत्या. पण त्याचा तसा कोणताच परिणाम काँग्रेसवर झाला नाही. कारण काँग्रेसची पाळेमुळे गोव्यात खोलवर रुजलेली आहेत. मुक्तीनंतरच्या काळात गोव्यात परप्रांतीय अधिकारी एका विशिष्ट कारणास्तव आणले गेले. त्यातूनच पुढील अनेक समस्या ओढवल्या. आज गोव्यात परप्रांतीयांची संख्या वाढण्याचे तेच कारण आहे. पण मुद्दा तो नाही, तर काही परप्रांतीय नेतेच गोंयकारपणाबाबत जो कळवळा व्यक्त करतात त्याकडे म्हणे लोक आता संशय घेऊ लागले आहेत. ∙∙∙

पोलिसांची कमकुवत बाजू...

म्हापसा येथील ताज्या दरोड्यामुळे गोवा पोलिसांची नाचक्की झाल्याची जनभावना बनली आहे. कारण यंत्रणेने कितीही सारवासारव केली व आता आपण काही संशयितांना पकडल्याचा दावा केला, तरी भरवस्तीत पडलेला दरोडा व दरोडेखोर गोव्याबाहेर निसटण्यात यशस्वी ठरले, हे नाकबूल करता येत नाही. पोलिस खात्याकडे आता भरपूर मनुष्यबळ तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीही आहे, मग गोव्यात गुन्ह्याचे प्रमाण दिवसागणिक का वाढत आहे, असा प्रश्न लोकांना पडला आहे. खरे तर एखाद्यावर नजर पडताच पोलिसांना तो गुन्हेगार की साधी व्यक्ती, ते कळायला हवे. मग सहा ते साथ अट्टल गुन्हेगार म्हापशातील त्या वस्तीत पोचलेच कसे व काही तास लुटमार करून आरामात पणजीपर्यंत पोचले कसे? वाटेत कुठेच त्यांना अटकाव कसा झाला नाही? याचा शोध वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घ्यावा अशीही मागणी होऊ लागली आहे. ∙∙∙

चर्चा ‘रामा’च्या तपासाची!

रामा काणकोणकर यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा तपास आता एक विनोदाचा विषय बनू लागला आहे. लोकांना वाटले होते, की न्यायालयात जाताच पोलिसांचा गियर बदलेल, पण झाले उलटेच! शुक्रवारी न्यायालयात ‘जेएमएफसी’मध्ये दाखल केलेल्या माहितीत अजून काही माहिती वाढली, असे दिसलेच नाही. पोलिस खरोखरच तपास करत आहेत, की एखाद्या मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक हा तपास धीमा ठेवला जात आहे? न्यायालयाचे दडपण असूनही जर हेच चित्र असेल, तर या प्रकरणातील ‘मोठे मासे’ अजूनही पोलिसांच्या जाळ्याबाहेर का आहेत, हे सहज लक्षात येते, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका ठरलेल्या स्क्रिप्टनुसार चालला आहे, असे आता लोक आणि सामाजिक कार्यकर्ते बोलू लागले आहे. ∙∙∙

‘बिग बी’ ला मानवंदना!

‘बिग बी’ म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सगळाच भारत भारून गेलेला असतो. कित्येक कलाकारांचे ते प्रेरणास्थान बनले आहे. गोव्यातील कलाकारही त्याला अपवाद नाहीत. आज ११ ऑक्टोबर ‘बिग बी’ चा वाढदिवस. त्यानिमित्त कुंकळ्ळी येथील हरहुन्नरी कलाकार विदेश शिंदे यांनी सतत १८ दिवस मेहनत घेऊन एका काळ्या काचेवर दगडाच्या साहाय्याने रेषा करते ‘बिग बी’ची ही फ्रेम बनवली आहे. यापूर्वी विदेशने पंडित अजित कडकडे यांचेही असेच पेंटिंग बनवून त्यांना गोमंतभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता, त्यावेळी भेट दिली होती. ∙∙∙

अमित द्वयींची परीक्षा!

दिल्लीतील निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे डोळे खाडकन उघडले आणि आपल्या पक्षावर काँग्रेसने अन्याय केल्याची पुरती जाणीव त्यांना झाली. त्यामुळे त्यांनी तत्काळ काँग्रेसबरोबर कुठेच युती करायची नाही, असे ठरवून टाकले. त्यामुळे गोव्यातही त्याचा कित्ता येथील नेत्यांच्या मनाविरुद्ध का होईना, पण गिरवावा लागला आहे. गोव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे, कारण आम आदमी पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस अजूनही कोणाशी युती करणार, हे कळत नाही. तिकडे गोवा फॉरवर्ड-रिव्हॉल्युशनरी यांचे सख्य होणार, असे छातीठोकपणे नेते सांगत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होणार असल्याने ‘आप’चे ॲड. अमित पालेकर आणि काँग्रेसचे अमित पाटकर यांच्या नेतृत्वाची कसोटी असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील निकाल विधानसभा निवडणुकीसाठी फायदेशीर असतो, त्यामुळे काही महिन्यांत अमित द्वयींची परीक्षा सुरू होईल हे नक्की. ∙∙∙

‘माझे घर’ नंतर कोटीतीर्थ

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेची नाडी नीट ओळखली आहे. त्यांनी पोर्तुगीज काळात पाडण्यात आलेल्या मंदिरांच्या बदल्यात एक प्रतिकात्मक मंदिर उभारणीस गती दिली आहे. कोटीतीर्थ कॉरीडॉर नावाने गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या तयारीचा आढावा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी घेतला. दिवाडी बेटावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती देण्यात आली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत प्रतिकात्मक मंदिर लवकर उभे करण्याचे ठरवले आहे. ∙∙∙

वेंझीबाब हा पोरखेळ वाटतोय!

जर सर्कशीतल्या जोकरने गंभीर बाब प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, तरी उपस्थित प्रेक्षक जोकरची कोणतीही क्रिया गांभीर्याने घेणारच नाहीत. कारण जोकर हा जोकरच असतो. राज्यातील आम आदमी पक्षाने खराब रस्त्याची स्थिती व सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागातील भ्रष्टाचार व चुकीची नीती उघड करण्यासाठी ‘बुराक’ म्हणजे रस्त्यावरील खड्डे मोहीम राबवली, ती खरीच स्तुती करण्यासारखी आहे. यासाठी ‘आप’ने बरेच कष्ट घेतले, पैसे ही खर्च केले. या मोहिमेची जागृती करण्यासाठी ‘आप’ने प्रत्येक मतदारसंघात शंभरावर बॅनर लावले. मात्र या जागृती मोहिमेत जनतेच्या सह्या घेतलेले निवेदन देण्यासाठी गेले असताना आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी यांनी जे वर्तन केले, त्यावरून ‘आप’ आता टीकेचा धनी बनत आहे. कृषिमंत्री रवी नाईक यांच्याशी संवाद साधताना ‘आप’ आमदाराचे व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचे वागणे पोरकटपणाचे होते, असा सूर सोशल मीडियावर ऐकायला मिळत आहे. एका गंभीर समस्येची मांडणी कॉमेडी सर्कस झाल्याचा दावा आता नेटिझन करायला लागले आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: धक्कादायक! वर्गमित्राने जेवणाच्या बहाण्याने बाहेर नेलं, मग आणखी दोघे आले अन्... MBBSच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

कंठ दाटला, डोळे भरुन आले! रामा काणकोणकरांना 24 दिवसांनी डिस्चार्ज, व्हिलचेअरवरुन आले बाहेर Watch Video

Purple Fest Goa: जगातील सर्वात मोठी अगरबत्ती; गोव्यातील आंतरराष्ट्रीय 'पर्पल फेस्ट'मध्ये दरवळला सुगंध!

Viral Video: 'पासपोर्ट नको, तुम्ही आमचे भाऊ' भारतीय बाईकरला अफगाणिस्तानात थेट प्रवेश! बॉर्डरवरील दृश्याचा व्हिडिओ व्हायरल

Amitabh Bachchan: जन्मापूर्वीच झालेली भविष्यवाणी! हरिवंशराय बच्चन का म्हणायचे 'अमिताभ'ला वडिलांचा पुनर्जन्म?

SCROLL FOR NEXT