Revolutionary Goans | Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: विरोधी पक्षातून ‘आरजी’ बाहेर! भाजपला पूरक घेतली भूमिका; 2027 ला मोजक्याच जागा लढवणार

Revolutionary Goans BJP Support: भाजपविरोधात विरोधक एकवटत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच सत्ताधारी भाजपला पूरक अशी भूमिका रिव्होल्युशनरी गोवन्सने घेतल्याचे दिसून येते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भाजपविरोधात विरोधक एकवटत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच सत्ताधारी भाजपला पूरक अशी भूमिका रिव्होल्युशनरी गोवन्सने घेतल्याचे दिसून येते. विरोधकांची बेकी सत्ताधाऱ्यांच्या पुन्हा एकदा पथ्यावर पडेल हेही स्पष्ट झाले आहे.

विरोधी पक्षांच्या आघाडीतून रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजी) बाहेर पडल्याचे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आणि आज यावर शिक्कामोर्तब झाले. भू माफियांपासून गोमंतकीयांच्या जमिनी सुरक्षित ठेवत गोव्याची (Goa) अस्मिता जपण्यासाठी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष नव्याने कार्य सुरू करणार आहे. गोमंतकीयांच्या हितासाठी पक्ष कोणतीही तडजोड करीत नाही, त्यामुळेच हा निर्णय घेतल्याची सारवासारव त्यांनी केली आहे.

पक्षाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीत निवडक जागा लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या मत विभागणीचा फायदा भाजप मगो युतीला होणार हेही आता कळून चुकले आहे.

वीरेश बोरकर ‘आरजी’ सोबत ः परब

परब म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने ३८ जागा लढविल्या, त्यावर पक्षाचे १७ लाख खर्च झाले. आमदार वीरेश बोरकर हे आरजी सोबतच आहेत. विधानसभेत त्यांनी राज्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत. त्यांना इतर विरोधी आमदारांची अजिबात साथ लाभली नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) विरोधात असलेले आप व काँग्रेस हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. गोमंतकीयांच्या जमिनी व अस्मिता सुरक्षित ठेवण्यासाठीचा लढा चालू ठेवण्यासाठीच इतर विरोधी पक्षांपासून वेगळेच राहण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

आमदार वीरेश विरोधी पक्षातच : युरी

आमदार वीरेश बोरकर विरोधी पक्षात आहेत. आपणास विश्वास आहे की त्यांनी राज्यातील विविध मुद्दे प्रखरपणे मांडले आहेत. आमच्यात राजकीय मतभेद असू शकतात, पण ते मतभेद बाजूला ठेवून गोव्याच्या हिताचे प्रश्न मांडणे गरजेचे आहे. आमच्याकडे मर्यादित वेळ आहे आणि आपण सर्वांनी एकजूट राहून गोव्याचे प्रश्न मांडले पाहिजेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT