Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab: विरोधी पक्षाच्या पोस्ट लाईक केल्यास खबरदार; तुकारामांचा RG सदस्यांना दिला कारवाईचा इशारा

Revolutionary Goans Party: रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज (तुकाराम) परब यांनी पक्षातील सदस्यांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Sameer Amunekar

पणजी: रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज (तुकाराम) परब यांनी पक्षातील सदस्यांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, "विरोधी पक्षांच्या फेसबुक पोस्ट किंवा पक्षाविरोधी पेजसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क साधणे हे पक्षविरोधी कृती मानली जाईल. अशा वर्तनावर कठोर कारवाई करण्यात येणार", असं मनोज परब यांनी सांगितलं.

मनोज परब यांनी पक्षाच्या सदस्यांना वारंवार सूचना दिल्यानंतरही काही सदस्य विरोधी पक्षांच्या सोशल मीडिया पोस्टशी संपर्क साधत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, अशा कृतींना पक्षविरोधी मानलं जाईल आणि त्यावर कठोर कारवाई केली जाईल.

"गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असलेल्या आरजीपी पक्षाने पक्षातील शिस्त आणि वचनबद्धतेवर भर दिला आहे. आरजीपी हा केवळ एक पक्ष नाही, तर गोव्याच्या प्रगतीसाठी एक सामायिक दृष्टिकोन आहे", अशा स्पष्ट शब्दांत मनोज परब यांनी सदस्यांना संदेश दिला.

पक्षातील काही सदस्य आणि पदाधिकारी विरोधी पक्षांच्या विचारसरणीच्या पोस्ट्स शेअर करत आहेत, त्यांच्या पोस्टला लाईक करत आहेत, संवाद साधत आहेत. अशा कृतीमुळे पक्षाची प्रतिमा आणि एकता बाधित होते.

पक्षाविरोधी चुकीचं वर्तन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मनोज परब पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे. आरजीपी पक्ष अधिक बळकट आणि एकसंध ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raigad Fort: मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी; 'किल्ले रायगड'

Kuldeep Yadav Record: परदेशी मैदानांवर कुलदीपची 'जादू'! चहलला पछाडून बनला 'नंबर 1' भारतीय गोलंदाज; ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधली किमया VIDEO

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

SCROLL FOR NEXT