Manoj Parab dainik gomantak
गोवा

आरजीचे उद्दीष्ट 2027, गोव्यातील सर्व निवडणुका लढविणार

आरजी गोव्यातील सर्व निवडणुका लढविणार

दैनिक गोमन्तक

पणजी : नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांना धक्का देत गोव्याच्या राजकारणात आरजी ने प्रवेश केला आहे. आता पर्यंत आरजी फक्त आंदोलने करत ‘उजो...उजो’ च्या घोषणा देऊन गोंधळ घालतं होतं. पण याच आंदोलनांनी आरजीचा अश्व चौफेर उधळत विधानसभेत गेला. त्यामुळे आरजीने आपले राजकीय ताकद वाढविण्याचा विचार पक्का केला आहे. तसेच गोव्याच्या राजकारणात एक विश्वासक पक्ष म्हणून लोकांच्या समोर जाण्यास ते तयार आहेत. त्याच अनुशंगाने त्यांनी आपले ध्येय ठरवले असून येथून पुढे होणाऱ्या गोव्यातील सर्व निवडणुका लढविणार असल्याचे रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे (आरजी) संस्थापक मनोज परब यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे 1 एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. (Revolutionary Goans Party contest all elections in Goa)

'रिव्हॉल्युशनरी गोवन्सने (Revolutionary Goans Party) आपल्या पाहिल्याच निवडणुकीत 9.54 टक्के मते मिळविली आहेत. तर भाजप (BJP) व काँग्रेस (Congress)या दोन राष्ट्रीय पक्षाच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) आरजी डार्क हॉर्स ठरली आहे.

दरम्यान परब यांनी, रात्री उशिरा फेसबुक (Facebook) पोस्ट करत, आपल्या पक्षाला लोकांनी आरजीला (RG) संस्थात्मक पाठिंबा द्यावा तर पक्षासाठी अर्थिक मदत ही करावी असे आवाहन केले. यावेळी त्यांनी, 2027 साठी आमचे ध्येय आहे. ज्यासाठी पक्षाने स्वतःला तयार करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

तर गोव्यातील (Goa) प्रत्येक निवडणूक आरजी लढवणार आहे, मग जिल्हा पंचायत असो, नगरपालिका (Municipality) निवडणूक असो की लोकसभा. आम्हाला सिद्ध व्हायचं आहे. तसेच परब म्हणाले. आम्हाला आमच्यासोबत अधिक लोकांची गरज आहे. आम्हाला सर्वांचे मार्गदर्शन हवे आहे. आम्ही तरुण आहोत आणि लोकांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

वीरेश बोरकर यांच्या विजयाने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि तरूण मुलांमध्ये उत्साह संचारला आहे. 9.5% किंवा 92,000 पेक्षा जास्त मते मिळविणाऱ्या RG ने पुढील निवडणुकीत (Election) स्वतःला 3.5 लाख मते मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आम्ही पंचायत निवडणूक लढवावी,. आम्ही व्यवस्थेत यावे, ग्रामसभांमध्ये सहभागी व्हावे, आमची उपस्थिती वाढवावी, लोकांचे मुद्दे मांडावेत, असे लोकांना वाटते. पंच आणि सरपंचांनी (Sarpanch) गोवा उद्ध्वस्त केला असून अनेक एनओसी दिल्या आहेत. इतकेच काय स्थलांतरितांना मतदानाची (Voting) परवानगी दिली आहे. ज्यामुळे ते आज टेकड्या वापरत आहेत. तर ज्या मतदारांनी काँग्रेस, आप, टीएमसी आणि इतर पक्षांना मतदान केले ते मतांचे विभाजन करणारे आहेत, असा हल्लाबोल परब यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT