Revolutionary Goans Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

विधानसभा अधिवेशन नियोजित वेळेत घेण्याची 'आरजी'ची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यातील विविध प्रश्‍न मांडण्यासाठी योग्य वेळ मिळणे गरजेचे असल्याने विधानसभा अधिवेशन नियोजित वेळेत म्हणजेच 25 दिवस घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आरजी पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी केले.

पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते. आरजी पक्षाचे आमदार विरेश बोरकर जे पाच खाजगी ठराव मांडणार आहेत यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, राज्यातील सुमारे 18 हजार हेक्टर जमीन खाजन शेतीखाली येते. आमच्या पूर्वजांनी या जमिनी तयार केल्या. आमचे समाजिक तसेच अर्थकारण आधारित आहे, त्याच्या संवर्धनासाठी केंद्र सरकाराकडे 5 हजार कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे.

दुसरा ठराव हा मतदान ओळखपत्रासंबंधी असून, राज्य सरकारने एक स्वतंत्र समिती स्थापन करून गोव्यात जेवढी बोगस मतदान ओळखपत्रे आहेत, ती रद्द करावीत, तसेच तिसरा ठराव हा परप्रांतीय कामगारांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यासंदर्भात असणार आहे. कारण ते आपल्या गावात गुन्हा करून येतात व येथे पुन्हा गुन्हा करून परत जातात. त्यामुळे गोवेकर तसेच पर्यटकांच्या संरक्षणासाठी हे करणे गरजेचे आहे.

सांतआंद्रे मतदारसंघातील कुडका या गावात अजूनही क्रीडांगण नाही. त्यामुळे येथे क्रीडांगण व्हावे तसेच गोव्यात जे नवीन फुटबॉल स्टेडियम होत आहे त्या स्टेडियमला ब्रह्मानंद-ब्रुनो हे नाव द्यावे, असे पाच ठराव मांडणार असल्याचे मनोज परब यांनी सांगितले.

हे आहेत पाच खासगी ठराव

  • खाजन जमिनींच्या संवर्धन व विकासासाठी केंद्राकडे 5 हजार कोटींची मागणी.

  • राज्य सरकारने स्वतंत्र समिती स्थापन करून बोगस मतदान ओळखपत्रे रद्द करावीत.

  • परप्रांतीय कामगारांची नोंदणी अनिवार्य करावी.

  • सांतआंद्रेतील कुडका या गावी क्रीडांगणाची मागणी.

  • जुन्या स्टेडियमचे नाव बदलून किंवा नव्या स्टेडियमला ब्रह्मानंद-ब्रुनो हे नाव द्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ इथेच का हवा आहे? दबावामुळे स्थानिक संतप्त; बैठकीसाठी सरसावल्या बाह्या

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

SCROLL FOR NEXT