Revolutionary Goans Party Chief Manoj Parab meets Maharashtra CM Eknath Shinde Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans : नेत्यांच्या भेटीगाठींचा गुंता सुटला; मनोज परबांनी सांगितलं खरं कारण

धोरण समजून घेण्यासाठीच प्रादेशिक पक्ष नेत्‍यांची भेट घेतल्याचं मनोज परब यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच ‘आरजी’चे धोरण, पोगो विधेयकाशी तडजोड नाही असंही ते म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Revolutionary Goans : देशभरातील विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना भेटून त्यांचे धोरण समजून घेणार आहे. या उद्देशाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांनी जनतेसाठी राबविलेली विविध धोरणे समजून घेतली आहेत. परंतु आमच्या धोरणांशी आणि पोगो विधेयकाशी तडजोड करणार नाही, अशी माहिती रिव्होल्‍युशनरी गोवन्सचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी दिली. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्यासोबत गोमंतकीयांच्या हक्कांसाठी सुरू असलेली लढाई आणि ‘आरजी’ पक्षाचे काम या दोन विषयांवर आपण चर्चा केली. गोमंतकीय जनतेच्या हक्कांसाठी आरजी सदैव काम करणार आहे. प्रादेशिक पक्षांच्या कार्यशैलीबद्दल, नागरिकांसाठी करत असलेल्या चांगल्या कामाबद्दल आम्हाला खूप माहिती मिळाली, असे परब म्हणाले.

15 वर्षांच्या रहिवासी प्रमाणपत्राच्या आधारे राज्यात येऊन स्थायिक झालेल्यांना नोकऱ्या द्यायच्‍या असल्याने सरकारला पोगो विधेयक मंजूर करायचे नाही. भाजप सरकारला केवळ बिगर गोमंतकीयांना नोकऱ्या देऊन मतांचे राजकारण करण्यात रस आहे, असा आरोप ‘आरजी’चे सर्वेसर्वा मनोज परब यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT